सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना क्लीनचिट; कोणतीही कारवाई नाही, कार्यकाळ पूर्ण करणार
सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना क्लीनटिच देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोणतिही कारवाई होणार नसून उर्वरीत चार महिन्यांचा कार्यकाळ त्या पूर्ण करणार आहेत. तपास यंत्रणा आणि अर्थ मंत्रालयाने त्यांची चौकशी पूर्ण केली असून त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही किंवा बूच यांच्यवरील आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुराने नाहीत. त्यामुळे त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे.
बूच आपल्या पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यात त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे त्यांना क्लीनचिट मिळाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे. आता त्या त्यांचा उवर्रित चार महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर काँग्रेसने सेबी प्रमुख बूच यांच्यावर पदाचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. संसदेच्या अदिकवेशनात हा मुद्दा बराच गजाला होता. या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली असून त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे आढळे नाहीत. सेबी प्रमुख बुच यांचे अदानी समूहाशी अघोषित आर्थिक संबंध असू शकतात, असे हिंडेनबर्ग यांनी म्हटले होते. त्यानंतर या मुद्द्याची चर्चा होत होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List