नेरळच्या आरोग्य केंद्रात पाणीबाणी; रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टरांनाही फटका

नेरळच्या आरोग्य केंद्रात पाणीबाणी; रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टरांनाही फटका

>> अजय गायकवाड

काही महिन्यांपूर्वी वीज नसल्याने मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती करावी लागल्याची घटना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली होती. आता तर याच प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने त्याचा फटका रुग्णांसह डॉक्टरांनादेखील बसत आहे, तर टाकीत पाण्याचा ठणठणाट असल्याने शौचालय व बाथरूममध्ये पाण्याचा टिपूसही नाही. रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टरांना या पाणीबाणीचा फटका बसत आहे.

कर्जतनंतर नेरळ हे दुसरे मोठे शहर आहे. नेरळ परिसरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या वाढली, तर शहरात शासकीय आरोग्य सेवा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे एकमेव नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोल्हारे, ममदापूर, शेलू, माणगाव आदी ग्रामपंचायतीमधील नागरिकांसाठीदेखील हेच आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रावर मोठा भार आहे. सध्या नेरळ ग्रामपंचायत शहरात पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अकार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे शहरात नागरिकांकडून पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे, तर आरोग्य केंद्रात असलेल्या जुन्या हातपंपावरून पाणी घेण्याचा प्रयत्न केला असता तोही फोल ठरला आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या पाइपलाइनवरून येणारे पाणी कमी दाबाने येत असल्याने ते आरोग्य केंद्रात उंचीवर असलेल्या टाक्यांमध्ये जात नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. रुग्णांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून विकतचे पाणी आणावे लागते.

… तर आंदोलन करू !
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आहे. आजूबाजूच्या आमच्या अनेक आदिवासी वाड्या-वस्त्यांना हे आरोग्य केंद्र वरदान ठरले आहे. मात्र येथे सुविधांची कायम वानवा आहे. छोट्या गोष्टींसाठी जर सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागत असेल तर शासन नक्की कुणासाठी राबतेय हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. येथील पाण्याचा प्रश्न लवकर निकाली काढावा, अन्यथा आम्हाला त्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी दिला आहे.

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या पाण्याच्या लाइनला पुरेसा दाब नसल्याने पाणी टाकीत चढत नाही. त्यामुळे टंचाई उद्भवली आहे, तर पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नेरळ, कोल्हारे दोन्ही ग्रामपंचायतींना आम्ही भेट देऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. लवकरच तोडगा काढला जाईल.
>> डॉ. नितीन गुरव, तालुका आरोग्य अधिकारी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग महाराष्ट्र तुटू देणार नाही, महाराष्ट्र लुटू देणार नाही! अंबामातेचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी फुंकले रणशिंग
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबामातेचे दर्शन घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राधानगरी...
आज मुंबईत महाविकास आघाडीची दणदणीत सभा! राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या तोफा धडाडणार
‘सामना’चे जीमेल, यूटय़ुब चॅनेल हॅक, गैरवापर रोखण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार
कुठेतरी थांबले पाहिजे! शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत
ठसा – श्याम मोकाशी
सामना अग्रलेख – हिंदू खतरे में! योगींना कॅनडात पाठवा
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? अटीतटीच्या लढाईसाठी मतदान सुरू; विजयाची समान संधी असल्याचा अंदाज