लाइट, कॅमेरा, अॅक्शन आणि झालं रक्तदान…! भाजपच्या महापौराची नौटंकी व्हायरल, काँग्रेसची सडकून टीका
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हणतात. पण भाजपच्या एका महापौरांनी इथेही चमकोगिरी करणं सोडलं नाही. रक्तदान शिबिरात भाजपच्या महापौरांनी केलेल्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये हा प्रकार घडला. मुरादाबादमधील भाजपचे महापौर विनोद अग्रवाल हे आता वादात सापडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त भाजपच्या स्थानिक कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मुरादाबादमधील भाजपचे महापौर विनोद अग्रवाल हे कार्यालयात पोहोचले. तिथे ते रक्तदानासाठी बेडवर झोपले. जवळच उभ्या असलेल्या डॉक्टरांनी इंजेक्शन काढलं, भाजप कार्यकर्त्यांनीही व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. पण रक्तदान करण्यापूर्वीच भाजपचे महापौर विनोद अग्रवाल उठून उभे राहिले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हणतात. पण भाजपच्या महापौराने इथेही चमकोगिरी करणं सोडलं नाही. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील भाजपचे महापौर विनोद अग्रवाल यांनी रक्तदान शिबिरात केलेल्या कारनाम्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/EFZtUsBQMH
— Saamana (@SaamanaOnline) September 20, 2024
काय घडलं नेमकं?
रक्तदानाच्या ठिकाणी आलेल्या महापौर विनोद अग्रवाल बेडवर झोपले आणि डॉक्टरांनी आधी त्यांचा बीपी तपासला. त्यानंतर इंजेक्शन काढून रक्तदानाची प्रक्रिया सुरू केली. पण रक्तदान करण्यापूर्वीच महापौर अग्रवाल हसू लागले. राहू द्या डॉक्टरसाहेब, मी तर असंच आलो होतो, असे म्हणत अग्रवाल उठून उभे राहिले.
भाजपचे महापौर विनोद अग्रवाल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि आता विनोद अग्रवाल यांच्यावर जोरदार टीका होता. रक्तदान करायचं नव्हतं तर एवढा दिखावा कशासाठी केला? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. वाद निर्माण झाल्याचे पाहून अखेर महापौर विनोद अग्रवाल यांनी डायबेटीज असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List