सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावे! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

जगभरात सध्या अनेक उलथापालथी होत आहेत. एकीकडे रशिया-युक्रेन, तर दुसरीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. हिंदुस्थाचे शेजारील देश बांग्लादेश, पाकिस्तानमधील परिस्थितीही चिंतेची बाब आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान केले असून सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले.

हिंदुस्थान हा शांतताप्रिय देश आहे. पण शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांना युद्धासाठी तयार राहण्याची गरज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. लखनऊ येथील पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमासमधील संघर्ष आणि बांगलादेशीत सद्यस्थितीचा दाखला देत राजनाथ सिंह यांनी भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेण्याचे आणि अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन सशस्त्र दलांना केले. यासह उत्तरकडील राज्यांमध्ये शांतता आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी सीमेवरील आणि शेजारील देशांचे विश्लेषण करण्याची गरजही राजनाथ सिंह यांनी अधोरिखित केली.

राजनाथ सिंह म्हणाले की, जगभरात अस्थिरता असताना हिंदुस्थानमध्ये शांतता नांदत असून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. मात्र वाढत्या आव्हानांमुळे आपण सावध राहण्याची गरज आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लक्ष देणे आणि त्यासाठी मजबूत राष्ट्रीय सुरक्षा असणे आवश्यक आहे.

आपल्याकडे पारंपरिक आणि अत्याधुनिक अशी मिश्र युद्धजन्य उपकरणे असणे आवश्यक आहेत, असे म्हणत सिंह यांनी लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर, तसेच आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अंतराळ व इलेक्ट्रॉनिक युद्धातील क्षमता वाढवण्यावर भर देण्याचे आवाहनही केले. अर्थात हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नाही. मात्र ते अप्रत्यक्षपणे युद्धाचा मार्ग आणि परिणाम ठरवत असतात, असेही सिंह यांनी अधोरेखित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं ‘…तेव्हा सर्वात आधी गाडी घेऊन जाणारा मी होतो, मी कुटुंबात कधी…’, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाऊ उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. राज ठाकरे यांची दादर माहीम मतदारसंघात मनसे...
राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश, मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक
‘तुमची त्यांना भीतीच उरली नाही’, बेधडक राज ठाकरेंचं अत्यंत कळकळीचं भाषण
मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती
चालल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर ‘या’ चुका टाळा
मशाल अशी पेटून धगधगू द्या की, भ्रष्टाचाऱ्यांच्या बुडाला आग लागली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची गर्जना