‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू तिच्या चित्रपटांमुळे तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते . तिने तिच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘पुष्पा’ चित्रपटात तिने केलेला आयटम सॉंग सर्वात जास्त चर्चेत ठरलं. पण, तुम्हाला माहिती आहे का की ‘ऊ अंटावा’ हे आयटम सॉंग करण्यापूर्वी, तिला ते न करण्याचा सल्ला देण्यात आला होता? त्यावेळी त्यांच्या घटस्फोटाबद्दलही खूप चर्चा रंगली होती. एवढेच नाही तर घटस्फोटानंतर तिला फार कुठे न जाता घरीच राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता. समांथा तिच्या या नात्याबद्दल, घटस्फोटाबद्दल काही मुलाखतींमध्ये बोलताना दिसली आहे.
घरची परिस्थिती पाहता समांथाने स्वत:चा खर्च उचलण्यासाठी मेहनत घेतली
खरंतर, समंथा रूथ प्रभू आज 37 वर्षांची झाली आहे. 28 एप्रिल 1987 रोजी तिचा जन्म झाला. तिने काल म्हणजे 28 एप्रिल 2025 रोजी तिने तिचा 37वा वाढदिवस साजरा केला आहे. तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तिचे वडील जोसेफ प्रभू तेलुगू आणि आई निनेट प्रभू मल्याळी आहेत. समंथाचे संगोपन चेन्नईमध्ये झाले. तिच्या कुटुंबाची परिस्थिती अशी होती की, बारावी नंतरचे तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र तिने स्वतः मॉडेलिंग करून स्वतःचा खर्च उचलला. तिने अनेक वाईट काळ पाहिले आहेत. मॉडेलिंगनंतर, अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये प्रवेश केला.सध्या ती दिग्दर्शक राज निदिमोरूला डेट करत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
तिने घटस्फोटाच्या वेळी तिच्या जवळच्या लोकांनी तिला अनेक विचित्र सल्ले दिले
रविवर्मनच्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली होती. समांथा तिच्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. 2017 मध्ये समांथा आणि नागा चैतन्य यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांचे लग्न त्या काळातील सर्वात महागड्या आणि चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होते. लग्नापूर्वी दोघांनीही तीन वर्षे एकमेकांना डेट केले. पण, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही वेगळे होण्याची घोषणा केली. यानंतर, समंथावर नाते तोडल्याबद्दल अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या सगळ्यामध्ये, समांथाने एका मुलाखतीत तिने घटस्फोटाच्या वेळी तिच्या जवळच्या लोकांनी तिला कसे सल्ले दिले आणि घटस्फोटामुळे ‘ऊ अंटावा’ आयटम सॉंग न करण्याचा सल्ला दिला होता.
;
लग्न तुटल्यावर अनेक आरोप झाले
पुढे त्याच संभाषणात, सामंथाने तिचे लग्न तुटल्याबद्दल आणि तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल सांगितले, तिने म्हटलं की तिला प्रश्न पडला होता की तिने काही गुन्हा केला आहे का? तो लपून का राहावा? सामंथाने स्वतः कबूल केले की तिने काहीही चुकीचे केले नाही. लोक तिचा तिरस्कार करतील, तिला ट्रोल करतील आणि ती घाबरून घरी बसेल याबद्दलचा विचार तिने कधीही केला नव्हता. जर लग्न तुटले तर त्यात तिचा काय दोष आहे असंही तिने म्हटलं होतं. घटस्फोटाबद्दल समांथाने म्हटलं की, तिने तिच्या नात्यासाठी 100 टक्के दिले होते. त्यामुशे लग्न तुटले त्यात ती स्वतःला दोष देत नाही.
त्यांनी ‘मनम’, ‘ये माया चेसावे’ आणि ‘ऑटोनगर सूर्या’मध्ये एकत्र काम केले आहे. त्याच वेळी, सामंथापासून वेगळे झाल्यानंतर, नागा चैतन्यने लग्न केले आणि शोभिता धुलिपालाशी लग्न केले. घटस्फोटानंतर सुमारे ३ वर्षांनी दोघांनी लग्न केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List