गोविंदाला घटस्फोट देण्याबद्दल पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाली, “तू जरा जास्तच..”
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा अजूनही आहेत. लग्नाच्या 38 वर्षांनंतर हे दोघं विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे तर एका मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरमुळे सुनिता त्याला घटस्फोट देणार असल्याची जोरदार चर्चा होती. या सर्व चर्चांवर अद्याप गोविंदाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु विविध मुलाखतींमध्ये सुनिताला घटस्फोटाबद्दल सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिताने पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. सुनिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका पत्रकाराने सुनिताला आधी विचारलं की, “सोशल मीडियावर तुमच्या नात्याबद्दल खूप चर्चा होत आहेत. गोविंदाला तुम्ही घटस्फोट देणार आहात, असं म्हटलं जातंय.” त्यावर सुनिता लगेच म्हणते, “अब तू ज्यादा ही बोल रहा है बेटा (आता तू जास्तच बोलू लागलाय बाळा).” सुनिता तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. घटस्फोटाच्या चर्चांवर ती पुढे म्हणाली, “मला काहीच फरक पडत नाही. कोणतीही बातमी येऊ दे. मी आधीच सांगितलंय की जोपर्यंत आमच्या तोंडून काही ऐकणार नाही, तोपर्यंत कोणत्याच बातमीवर प्रतिक्रिया देऊ नका. जब तक हम नहीं मुंह खोले.. बाद में सब गोले ही गोले (हसते).”
रविवारी सुनिता अहुजाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये पापाराझींनी तिला विचारलं, “गोविंदा सर कसे आहेत?” तेव्हा सुनिता खाली मान घालून कोणतीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून जाते. एका फॅशन शोदरम्यानही सुनिताला विचारलं जातं की, “गोविंदा सर कुठे आहेत?” त्यावर ती तोंड बंद करण्याचे हातवारे करते. हे पाहून बाजूला उभा असलेला मुलगा थोडा चकीत होतो आणि नंतर हसतो. हे सर्व इतक्यावरच थांबलं नाही. पापाराझी पुन्हा तिला गोविंदाविषयी प्रश्न विचारू लागतात. तेव्हा सुनिता थेट त्यांना म्हणते, “पत्ता देऊ का?”
सुनिताने सहा महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. इतकंच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही सुनिताने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List