डायबेटीज असणाऱ्यांनी पेरु खाणे का आहे गरजेचे! वाचा सविस्तर

डायबेटीज असणाऱ्यांनी पेरु खाणे का आहे गरजेचे! वाचा सविस्तर

उन्हाळ्यात पेरू बाजारात दिसू लागतात. उन्हाळ्यात वातावरणामध्ये उष्णता वाढू लागल्याने, आपल्या शरीरामध्येही अनेक बदल घडत असतात. हवामान बदलत आहे, अशा बदलत्या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पेरूचा समावेश करू शकता. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये सर्वाधिक फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते.

पेरु खाण्याचे फायदे

पेरूच्या बिया गॅस आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक आढळतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

 

पेरूमध्ये असलेले फायबर कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करू शकते. पेरूमध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते.

 

पेरू त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. असे म्हटले जाते की पेरू हे फायबरचे भांडार देखील आहे आणि हे फायबर बेड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सक्षम मानले जाते. विशेष म्हणजे हा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतो.

 

पेरूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर त्याचा तुमच्या प्रतिकारशक्तीवरही वाईट परिणाम होईल असे समजा. अशावेळी पेरूचे सेवन नक्कीच करा.मॅग्नेशियम शरीरात योग्य प्रमाणात प्रवेश करत असल्यास स्नायूंना खूप आराम मिळतो.

पेरूमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. यासोबतच ताण कमी करण्यासही हे उपयुक्त आहे. खराब जीवनशैली आणि आहारामुळे, लोकांना सर्दी आणि कफची समस्या असते. यामागे अॅलर्जी देखील असू शकते, परंतु यापासून मुक्त होणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही कफविरोधी गुणधर्म असलेल्या पेरूचे सेवन करू शकता.

 

कच्च्या लाल पेरूची खासियत म्हणजे याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे, त्यामुळे त्याचे सेवन जरूर करा.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या, मिटिंगला बोलावले अन् जाळ्यात अडकवले पुण्यातील मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या, मिटिंगला बोलावले अन् जाळ्यात अडकवले
बनावट डील करण्याच्या नावाखाली पुण्यातील उद्योगपतीला बिहारमध्ये बोलावून घेतले. पाटणा विमानतळावर उतरताच उद्योगपतीचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून...
सहारा समुहाची अॅम्बी व्हॅलीतील जमीन जप्त
नागपूरमध्ये आज ‘सद्भावना शांती मार्च’
‘ससून’च्या अहवालानंतर ‘दीनानाथ’वर गुन्हा
माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार
नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या एकजुटीचा महानिर्धार, उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन
बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास चीनचा नकार, अमेरिकेच्या टॅरिफला जशास तसे प्रत्युत्तर