बॉलिवूडकडून सक्षम कलाकारांची हत्या आणि…, अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, झगमगत्या विश्वाचं सत्य जाणून व्हाल हैराण
Bollywood Celebrities: झगमगत्या विश्वातील अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीचा दुसरा चेहरा समोर आणला आहे. आता देखील अभिनेत्री सीमा पाहवा यांनी बॉलिवूडबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे सीमा पाहवा यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बरेली की बर्फी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता त्यांनी बॉलिवूडबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सीमा पाहवा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडने सक्षम कलाकारांची हत्या केली… असं वक्तव्य सीमा पाहवा यांनी केलं आहे. सांगायचं झालं तर, सीमा पाहवा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पण त्यांना कोणत्याच सिनेमात मुख्य भूमिका मिळाली नाही… यावर देखील सीमा पाहवा व्यक्त झाल्या आहेत.
सीमा पाहलेवा म्हणाल्या, ‘मना एक प्रश्न कायम उपस्थित होतो, लोकं अभिनयाचं कौतुक करतात पण मला अद्याप कोणत्याच सिनेमात मुख्य भूमिका मिळालेली नाही. ही एका प्रकारची तक्रार आहे. पण नंतर मला असं वाटतं की, माझ्या काही मर्यादा आहेत. ज्यामुळे मला मुख्य भूमिका मिळत नाही.’
‘इंडस्ट्रीमध्ये आता उच्च स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे लवकरच इंडस्ट्रीचा निरोप घ्यावा असं वाटत आहे. बॉलिवूडती स्थिती आता फार वाईट आहे. सक्षम कलाकारांची हत्या होत आहे आणि उद्योजकांनी ताबा घेतला आहे. त्यांना त्यांच्या व्यावसायिक मानसिकतेने इंडस्ट्री चालवायची आहे. पण मला वाटत नाही की आपण, ज्यांनी इतक्या वर्षांपासून इंडस्ट्रीत काम केलं आहे, ते असं काम करू शकतात.’
‘पैसे कमावण्याला माझा विरोध नाही. पण कदाचित त्यांना आमची आता गरज नाही. ते आम्हाला बाहेर ठेवतात. आम्हाला जुने लोकं म्हणतात. त्यांचा असा विश्वास आहे की केवळ व्यवसायच चित्रपट यशस्वी करतो, कलाकार किंवा कथा नाही.’ असं देखील सीमा पाहलेवा म्हणतात.
सीमा पाहलेवा यांचे आगामी सिनेमे
सीमा पाहलेवा यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘भूल चूक माफ’ सिनेमात सीमा अभिनेता राजकुमार राव याच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात वामिका गब्बी, जाकिर हुसैन, रघुबीर यादव, संजय मिश्रा आणि जय ठक्कर देखील दिसणार आहे. 9 मे रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List