Pakistan Bomb Blast – पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, 7 जण ठार; 9 जखमी
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील शांतता समितीच्या कार्यालयात सोमवारी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सात जण ठार आणि नऊ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नाही. स्फोट इतका भीषण होता की यात शांतता समितीच्या कार्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यातील मुख्य शहर वाना येथे हा स्फोट झाला. वाना हे एकेकाळी पाकिस्तानी तालिबानचा बालेकिल्ला मानला जात होते. बॉम्बस्फोटात शांतता समितीच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आले होते. ही समिती तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ची विरोधक आहे. तसेच स्थानिक वाद सोडवण्यासाठी ही समिती काम करते. या स्फोटामागे टीटीपी असल्याचे बोलले जात आहे. टीटीपी अनेकदा नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List