‘कंगना रणौत यांना हे शोभत नाही हे…,’ अभिनेता रणदीप हुड्डा याची नाव न घेता टीका
बॉलीवूडची अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगणा रणौत यांच्या वक्तव्यावरुन नेहमीच वाद होत असतात. कंगणा यांनी कायम बॉलीवूडच्या नेपोटीझमवर टीका केली आहे. त्यांनी बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर कायम तोंडसुख घेतले आहे. आता या संदर्भात अभिनेता रणदीप हुड्डा याने आलिया भट्ट आणि कंगणा रणौत यांच्या वादावर अनेक वर्षांनी टिपण्णी केली आहे.
रणदीप हुड्डा याचा चित्रपट ‘जाट’ रिलीज झाला असून त्यात मुख्य भूमिका सनी देओल यांनी केली आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर एका पॉडकास्टमध्ये बोलताना हुड्डा याने आलिया भट्ट बद्दल एका प्रश्नाला उत्तर देताना कंगणा रणौत यांच्यावर टीका केली आहे
काय आहे नेमका वाद
साल २०२० रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटातील आलिया यांच्या अभिनयाला एव्हरेज असे म्हणून कंगणा यांनी तिच्यावर टीका केली होती. त्यावर रणदीप हुड्डा यांनी आलियाचा बचाव करताना ट्वीट केले होते. त्यांनी कंगणाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख न करता अभिनेता रणदीप हुड्डा याने मला आनंद आहे की आलियाने दुसऱ्यांच्या मताचा स्वत:च्या कामावर परिणाम होऊ दिला नाही.
अभिनेता रणदीप हुड्डा याची चित्रपट ‘जाट’ मधील व्हीलेनची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला जमवत आहे. या दरम्यान अभिनेता रणदीप हुड्डा याचे एक स्टेटमेंट सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात त्याने अभिनेत्री कंगणा रणौत आणि आलिया भट्ट संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कंगणा नाहक टार्गेट करत आहे – रणदीप
ती ( कंगणा ) नाहक आलिया हीला टार्गेट करीत आहे. माझी काही कंगणा हिच्या पर्सनली दुश्मनी नव्हती , असणारही नाही. मला पण वाटले की आलिया हीला वारंवार टार्गेट करणे योग्य नव्हे. कंगणा एक चांगली अभिनेत्री आहे. मी त्यांच्या टॅलेंटचा आदर करतो. परंतू दुसऱ्यांना नेहमीच कमी लेखण्याची त्यांनी करु नये. हे त्यांना शोभत नाही असे अभिनेता रणदीप हुड्डा याने म्हटले आहे. माझ्या सोबत हायवे चित्रपटात अभिनेत्री आलिया हीने काम केले होते. तेव्हा मला आलियाबद्दल आत्मियता वाटते, तिला माझ्याबद्दल वाटते का ते मला माहीती नाही. परंतू तिचे कॅरेक्टर ‘वीरा’ सोबत अनोखे बॉडींग झाले होते असे अभिनेता रणदीप हुड्डा याने म्हटले होते. विशेष म्हणजे अभिनेता रणदीप हुड्डा याने स्वत:चे पैसे घालून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट काढला होता. गेल्यावर्षी तो रिलीज झाला पण, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List