‘अखेरच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन..’; ऐश्वर्याबद्दल ‘ती’ बातमी देणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुनावलं

‘अखेरच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन..’; ऐश्वर्याबद्दल ‘ती’ बातमी देणाऱ्यांना अमिताभ बच्चन यांनी सुनावलं

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना जेव्हा कधी संधी मिळाली, तेव्हा ते त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने बोलतात. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी 2007 मध्ये लग्न केलं. अनेक मुलाखतींमध्ये बिग बींनी त्यांच्या सुनेचं आणि तिच्या कामाचं कौतुक केलं आहे. परंतु एका प्रसंगी त्यांनी एका वर्तमानपत्राला ऐश्वर्याबद्दल खोटी बातमी दिल्याप्रकरणी खूप सुनावलंदेखील होतं. बच्चन कुटुंबीय अनेकदा ट्रोलर्सच्या आणि टीकाकारांच्या निशाण्यावर येतात. मग ते जया बच्चन यांचं पापाराझींसोबतचं वागणं असो किंवा अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा असो. अनेकदा बच्चन कुटुंबीय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतात. अशाच एका प्रसंगी 2010 मध्ये मुंबईतल्या एका वृत्तपत्रात ऐश्वर्याबद्दल खोटी बातमी छापून आली होती. त्यावर बिग बींनी कडक शब्दांत सुनावलं होतं.

पोटाच्या क्षयरोगामुळे ऐश्वर्या गरोदर होऊ शकत नसल्याची ही बातमी होती. ही बातमी वाचून बिग बी प्रचंड संतापले होते. कोणत्याही तथ्याशिवाय बातमी देणाऱ्यांना त्यांनी चांगलंच खडसावलं होतं. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याबद्दलची संतप्त पोस्ट लिहिली होती. ‘आज मी अत्यंत तिरस्काराने आणि वेदनेनं ही पोस्ट लिहित आहे. ऐश्वर्याबद्दल लिहिलेला हा लेख पूर्णपणे खोटा, बनावट, निराधार, असंवेदनशील आणि पत्रकारितेच्या सर्वांत खालच्या दर्जाचा आहे’, असं त्यांनी लिहिलं.

या ब्लॉगमध्ये बिग बींनी असंही स्पष्ट केलं होतं की ऐश्वर्या राय ही त्यांच्यासाठी फक्त एक सून नाही तर त्यांच्या मुलगीसारखीच आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन, असंही त्यांनी लिहिलं होतं. ‘मी कुटुंबप्रमुख आहे. ऐश्वर्या ही फक्त माझी सूनच नाही तर ती माझी मुलगी आहे, एक महिला आहे आणि माझ्या घरातली ती एक स्त्री आहे. जर कोणी तिच्याबद्दल अपमानास्पद बोलत असेल तर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यासाठी भांडेन. जर तुम्हाला आमच्या कुटुंबातील पुरुषांबद्दल, अभिषेक किंवा माझ्याबद्दल काही बोलायचं असेल तर मी ते सहन करेन. पण जर तुम्ही माझ्या घरातील महिलांवर अन्याय्य टिप्पणी केली तर मी ते सहन करणार नाही’, अशा शब्दांत बिग बींनी इशारा दिला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल? तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
आपले आरोग्य ठणठणीत आहे की काही आजाराची लक्षणे आहेत. हे पटकण समजणं कठीण असतं. पण तुम्हाला माहितीये आपली नखे यामध्ये...
यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
कुणाल कामराला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, आदेश देईपर्यंत कारवाई न करण्याचे सरकारला आदेश
महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे; बिहारमध्ये मात्र बाटेंगें तो जितेंगे! उद्धव ठाकरेंची भाजपला सणसणीत चपराक
Video – जो पाखंडी आणि कपटी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो
Video – संजय राऊत यांनी ऐकवला कवी कलश यांनी शंभूराजेंना सांगितलेला मंत्र
आज पौर्णिमा की अमावस्या… कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले