‘अश्लीलता आहे ही…’ काजोलची बहीण तनिषाचा ड्रेस पाहून संतापले नेटकरी
अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तसेही तनिषाचे फिल्मी करिअर काही खास घडले नाही. काही निवडक चित्रपटांमध्ये तिने काम केल्यानंतर, तनिषाने अभिनयापासून स्वतःला दूर केले, परंतु मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतरही ती अनेकदा चर्चेत असते. आत पुन्हा एकदा तनिषा चर्चेत आली आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये ती पोहोचली होती, जिथे तिचा विचित्र लूक पाहायला मिळाला. तनिषा अशा कपड्यांमध्ये कार्यक्रमात पोहोचली की तिचा हा लूक पाहून तिला ट्रोल करण्यात येत आहे. एकतर तनिषाचा हा लूक लोकांना समजला नाही, तर काहींनी अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली. तनिषा तिच्या लूकमुळे टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे.
तनिषा मुखर्जीचा कार्यक्रमात विचित्र लूक अन् ड्रेस
13 एप्रिल रोजी तनिषा मुखर्जीने ‘वर्ल्ड मॅगझिनच्या कॉस्ट्यूम फॉर अ कॉज गाला’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. जिथे सुष्मिता सेन, हुमा कुरेशी, राजा कुमारी, बाबिल खान ते वामिका गब्बी असे अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व स्टार्सची विचित्र फॅशन पाहायला मिळाली. तनिषा मुखर्जी देखील या कार्यक्रमात असाच विचित्र ड्रेस घालून आल्याचं पाहायला मिळालं. पण त्या ड्रेसमध्ये ती स्वत: कंफर्टेबल दिसत नव्हती. तसेच तिला नीट चालताही येत नव्हते.
तनिषाचा लूक पाहून नेटकरी म्हणाले “अश्लील”
तनिषा मुखर्जीने पार्टीच्या थीमनुसार पोशाख निवडला होता, पण तो खूपच बोल्ड होता. अभिनेत्रीने एक ट्रान्सफरंट काळा असा जाळीदार असा गाऊन होता, ज्यावर मोठ्या आकाराचे पांढऱ्या रंगांचे फॅब्रिक गुलाब होते. तिने ज्वेलरी आणि डोक्यावर ड्रॅमॅटिक फॅसिनेटर घालून तिचा लूक पूर्ण केला होता. तनिषाने कार्यक्रमात प्रवेश करताच तिच्या पोशाखाचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. सोशल मीडियावर लोकांनी तिच्या लूकवर कमेंट करणे सुरु करत तिला या लूकवरून ट्रोल केलं आहे. तर काहींनी अभिनेत्रीचा लूक “अश्लील” असल्याचं म्हटलं. अनेकांनी तिचा हा लूक पाहून तिची तुलना उर्फी जावेदशी केली, जी तिच्या विविध फॅशन निवडींसाठी ओळखली जाते.
तनिषाला केलं जात आहे प्रचंड ट्रोल
एका वापरकर्त्याने कमेंट करत म्हटलं आहे की. ‘दुसऱ्या उर्फी जावेदची गरज नाही.’ तर, एकाने लिहिले,’ती खूप दिवसांपासून लक्ष वेधून घेत आहे.’ एकाने खिल्ली उडवत म्हटलं की, ‘जेव्हा कोणीही तुम्हाला मेट गालामध्ये आमंत्रित करत नाही.’ तर एकाने थेट तिला ‘मूर्ख’ म्हटलं आहे, या युजरने म्हटलं आहे की, “तनिषाकडून कधीच अशी अपेक्षा नव्हती.’ इतर अनेकांनीही व्हिडिओवर कमेंट करत तिच्यावर निशाना साधला. तसेच तिच्या या लूकबद्दल तिच्यावर रागही व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List