RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
सवाई मानसिंग स्टेडियमवर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच वादळ गोंगावलं आणि राजस्थानने गुजरातचा 25 चेंडू राखत 8 विकेटने पराभव केला. वैभवने सलामीला येत 38 चेंडूंमध्ये 11 खणखणीत षटकार आणि आणि 7 चौकारांच्या मदतीने चौफेर फटकेबाजी केली. ईशांत शर्मा, राशीद खानसह मोहम्मद सिराजला वैभवच्या धडाकेबाज फलंदाजीचा तडाखा बसला. डोळ्यांच पारणं फेडणारी फलंदाजी पाहून राजस्थानसह गुजरातच्या संघाने सुद्धा त्यांच कौतुक केलं. त्याने आयपीएलमधील पहिले शतक ठोकतं सर्वांनाच आपल्या नावाची दखल घेण्यात भाग पाडलं आहे. वैभवने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे गुजारतने दिलेले 210 धावांचे आव्हान राजस्थानने अगदी सहज पूर्ण केले. यशस्वीने सुद्धा 40 चेंडूंमध्ये नाबाद 70 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच बरोबर कर्णधार रियान परागने 15 चेंडूंमध्ये नाबाद 32 धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List