मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्हींचा वॉच

मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्हींचा वॉच

उपनगरी रेल्वे मार्गावर धावणाया लोकलमध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरील 30 लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये 60 सीसीटीव्ही पॅमेरे बसविले आहेत. उर्वरित 115 गाडयांच्या केबिनमध्ये लवकरच सीसीटिव्ही पॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दरम्यान, याला मोटरमनच्या संघटनेला तीव्र विरोध केला आहे.

पश्चिम रेल्वेवरील मोटरमन, गार्डच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मोटरमनकडून होणाया चुका आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही गाडी पुढे नेणे अशा घटना वारंवार घडतात. अशा घटनांमागील कारणे शोधता यावीत, यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबीनच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मात्र अशाप्रकारे सीसीटीव्ही पॅमेरे लावल्यामुळे गाडी चालवताना आमच्यावर दबाव येऊ शकतो, असा दावा करीत मोटरमन संघटनेने सीसीटीव्ही बसवण्याला तीव्र विरोध केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग
मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या...
कोण बनणार मुंबईचा नवीन पोलीस आयुक्त? स्पर्धेत ‘लेडी सुपरकॉप’ चे नाव
आधी पुनर्वसन, मगच विकास ! ठाण्याच्या चिरागनगरमधील आदिवासींचा टाहो
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलच्या इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
पुण्यात बनावट नोटांचा छापखाना
पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन