घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली, ‘जा तुला माफ…’

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली, ‘जा तुला माफ…’

RJ Mahvash on Breakup: कोरियोग्राफर धनश्री वर्मा हिला घटस्फोट दिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल याचं नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडलं जात आहे. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सर्वत्र महवश आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ स्वतः महवश हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तिने आपण ब्रेकअपला एवढं महत्त्व का देतो… यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

व्हिडीओमध्ये महवश म्हणते, ‘आजच्या पीढीचे ब्रेकअप्स एवढे घाणेरडे का असतात? ब्रेकअपला आपल्या आयुष्यातील एका छोटा भाग समजा आणि आयुष्यात पुढे जा. ब्रेकअपनंतर समोरच्या व्यक्तीवर आपण चिडतो रागावतो… अशात समोरच्या व्यक्तीला आपण नसल्याचा कधीच पश्चाताप होत नाही. पण तुम्ही त्या व्यक्तीला माफ केलं तर त्याच्या मनात देखील खंत राहते आपण कोणाला गमावलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा… असं करा आणि त्याला जाऊद्या.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

 

‘तुम्हाला असं वाटत असेल की सर्वकाही तुमच्या हातात आहे. पण असं काहीही नाही सर्वकाही देवाने ठरवलेलं आहे आणि तसंच होणार आहे.’ व्हिडीओ पोस्ट करत आरजे महवश हिने लक्षवेधी कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे. व्हिडीओसाठी कॅप्शन लिहित महवश म्हणते, ‘जा तुला माफ केलं, आता तू याठिकाणी आहेच नाही…’ सध्या महवश हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत म्हणले, ‘रील फक्त आणि फक्त चहल भाईसाठी होती.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘चहल भाईला सरळ सरळ बोलून टाक…’ अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘एक दिवस चहल भाई देखील आयुष्यात पुढे जाईल…’ अन्य एक नेटकरी म्हणाला ‘माफ करुन पुढे जाणं इतकं सोपं नाही…’ असं देखील नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाले आहेत.

सांगायचं झालं तर, युजवेंद्र चहल याच्या घटस्फोटानंतर महवशला क्रिकेटरसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलं. म्हणजे तिने पोस्ट केलेला व्हिडीओ चहल साठीच असावा अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण दोघांनी देखील घटस्फोटावर मौन बाळगलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आज पौर्णिमा की अमावस्या… कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले आज पौर्णिमा की अमावस्या… कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले
अनेकांना वाटलं पराभव झाला म्हणून शिवसैनिक खचला असेल. शिवसैनिक घरी बसला असेल. दहशतीखाली आहे असंही अनेकांना वाटलं असेल. पण आजच्या...
नेहा कक्कडच्या हातावरचा ‘तो’ टॅटू पाहून भाऊ टोनीला धक्का; थेट तिच्या पायाच पडला
कुणाल कामराला मोठा दिलासा, जबाब नोंदवण्यावरुन हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Heatstroke Protection : उन्हाळ्यात उष्मघातापासून बचाव करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय…
Photo – नाशिकच्या निर्धार शिबीरात उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
जो पाखंडी आणि कपटी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो; मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांची टीका
आता भाजपला ‘खांदा द्यायची’ वेळ आलीय… निर्धार शिबीरात शिवसेनाप्रमुखांचा आवाज घुमला आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला