IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज असलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातविरुद्ध सामन्यात वैभवने हा इतिहास रचला. याच सामन्यात वैभवची बॅट तळपली आणि त्याने पाच मोठे विक्रम केले आहेत. वैभवने 35 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. हे त्याचे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे.
Youngest to score a T20 1⃣0⃣0⃣
Fastest TATA IPL hundred by an Indian
Second-fastest hundred in TATA IPLVaibhav Suryavanshi, TAKE. A. BOW
![]()
Updates
https://t.co/HvqSuGgTlN#TATAIPL | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/sn4HjurqR6
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
वैभव सूर्यवंशी सोमवारी राजस्थानकडून यशस्वी जैस्वालसह सलामीला फलंदाजीला उतरला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत त्याने मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा अनुभवी गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट्स खेळले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List