40 मिनिटांत 4 किलोमीटर चालण्याचा फिटनेस ट्रेंड काय आहे? त्याचे फायदे जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावर एक फिटनेस व्हिडिओ ट्रेंड होत आहे. या व्हिडिओद्वारे 40 मिनिटांत 4 किलोमीटर चालण्याचे चॅलेंज दिले जात आहे. कोणत्याही वयोगटातील लोकं या फिटनेस ट्रेंडचे फॉलो करू शकतात. पण अनेकांच्या मनात असा प्रश्न उद्भवतो की या फिटनेस ट्रेंड केल्याने आपल्या आरोग्याला याचे दीर्घकालीन फायदे कोणते होणार आहेत. सोशल मिडियावर ट्रेंड होत असलेला चालण्याचा फिटनेस चॅलेंज खूप सोप्पा आहे, तुम्हाला 40 मिनिटांत 4 किलोमीटर वेगाने चालायचे आहे. या चॅलेंजमध्ये असे म्हटले आहे की ताशी सुमारे 6 किलोमीटर वेगाने चालावे लागते, या वेगाने चालणे इतके फायदेशीर आहे की त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो.
40 मिनिटांत 4 किमी चालणे/जॉगिंग करणे किंवा स्लो-मोशन व्यायाम करणे हा हृदयाचे आरोग्य सुधारण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तथापि, केवळ व्यायाम करून तुम्ही आजारांचा धोका टाळू शकत नाही, म्हणून याशिवाय, तुम्हाला तुमच्या जीवनशैली आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल.
दिवसाला 40 मिनिटांत 4 किमी?
दररोज 40 मिनिटे चालल्याने शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल दिसून येतात. अनेक संशोधनांमध्ये असा दावा केला आहे की जड व्यायामापेक्षा चालणे अधिक फायदेशीर आहे. जरी तुम्ही 40 मिनिटे चालू शकत नसाल, तरी त्याऐवजी 15-30 मिनिटे चालल्यास तुम्ही अनेक आजारांपासून तुम्ही तुमचा बचाव करू शकतात.
तुम्ही जितके जास्त चालाल तितके तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होईल. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. शारीरिक हालचालींमुळे केवळ हृदयाचे आरोग्य सुधारत नाही तर एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.
दिवसाला 40 मिनिटांत 4 किमी चाल्याणे तुमच्या शरीरात हे बदल होतात
दिवसाला 40 मिनिटांत 4 किमी चालणे हे हृदयासाठी फायदेशीर आहे, तसेच या फिटनेस ट्रेंड फॉलो केल्याने तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होते आणि शरीरातील रक्तदाब आणि ग्लुकोजची पातळी देखील कमी करते. वेगाने चालल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात, त्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारते. जलद चालणे मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, कारण ते तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते. चालण्यामुळे मन शांत राहते आणि शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
मेंदूचे आरोग्य
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी चालणे हा व्यायाम सर्वात फायदेशीर आहे. त्यासोबत चालणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अभ्यासानुसार, चालण्यामुळे एंडोर्फिन हार्मोन तयार होतो. यामुळे ताणतणावाची पातळी कमी होते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, धावण्यापेक्षा चालणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. यामुळे हृदयातील रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्टेरॉल वाढण्यापासूनही रोखले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List