आधार-पॅनमध्ये एकाच वेळी नाव, पत्ता, नंबर बदलणार; तीन दिवसांत डॉक्युमेंट्स होणार अपडेट

आधार-पॅनमध्ये एकाच वेळी नाव, पत्ता, नंबर बदलणार; तीन दिवसांत डॉक्युमेंट्स होणार अपडेट

आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा माराव्या लागतात. यामध्ये नागरिकांचा बराच वेळ जातो. मात्र आता या त्रासापासून सुटका होणार आहे. या कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा मारण्याची वेळ येणार नाही. केंद्र सरकार युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या पोर्टलवर एकाच ठिकाणी पत्ता, नंबर आदी अपडेट करता येईल. सर्व आवश्यक ओळखपत्रांमध्ये हे बदल ऑटोमॅटिक अपडेट होतील. सात कामकाजाच्या दिवसांत नव्या अपडेटसह ओळखपत्र पोस्टाद्वारे लोकांच्या घरी येईल. तसेच कार्यालयांत जाऊनही मिळवता येईल.

पोर्टल कसे काम करेल?

सर्व डेटा एकत्रित व्हावा अशा पद्धतीने पोर्टल डिझाइन करण्यात येत आहे. म्हणजे पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टसारखे ओळखपत्र एकत्रित येतील. आवश्यक बदलासाठी पोर्टलवर गेल्यानंतर कुठे बदल करायचा याचे पर्याय येतील. जसे की, मोबाइल नंबर बदलायचा असेल तर वेगळा पर्याय, पत्ता बदलायचा असेल तर वेगळा पर्याय असेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर सबमिट बटण दाबताच आवश्यक बदल प्रोफाइलवर दिसू लागतील. तीन दिवसांत ते अपडेट होतील.

नवे ओळखपत्र कसे मिळेल?

बदलांसह नवे ओळखपत्र मिळवण्यासाठीही या पोर्टलवर एक पर्याय असेल. त्यासाठी पोर्टलवर शुल्क भरता येईल तसेच अर्जही करता येईल. सात कामकाजाच्या दिवसांत नव्या अपडेटसह ओळखपत्र पोस्टाद्वारे लोकांच्या घरी येईल. ज्या लोकांना कार्यालयात जाऊन ओळखपत्र घ्यायचे असेल तर तोही पर्याय उपलब्ध असेल. पर्याय निवडल्यानंतर त्यांना मोबाइलवर अपडेटेड ओळखपत्र मिळण्याची तारीख आणि वेळ कळेल.

सध्या चाचणी सुरू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टमची चाचणी सुरू आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी होत्या, त्यांचे निवारण शेवटच्या टप्प्यात आहे. खास करून डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी एक फूलप्रूफ व्यवस्था बनवण्याचे आव्हान होते. ते पूर्ण केले जात आहे. सध्या जी चाचणी करण्यात आली, त्यात 92 टक्क्यांहून जास्त अचूकता दिसून आली.

98 टक्के वा त्याहून अधिक अचूकता मिळवताच ते परीक्षणासाठी लागू करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांतच सर्वसामान्य लोकांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात येईल. सध्या पोर्टलचे नाव ठरलेले नाही. अंतिम परीक्षण पूर्ण झाल्यानंतर नाव निश्चित केले जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
सवाई मानसिंग स्टेडियमवर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच वादळ गोंगावलं आणि राजस्थानने गुजरातचा 25 चेंडू राखत 8 विकेटने पराभव केला. वैभवने...
हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ईडी तपास बंद; दिल्ली कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला