रोज एक डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रोज एक डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

डाळिंब खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे अनेकजण त्यांच्या आहारात अनेक हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतात. अशातच तुम्ही जर रोज फळांचे सेवन करत असाल तर त्यात तुमच्या उत्तम आरोग्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करा. त्यातच आपण ‘एक डाळिंब शंभर आजारी’ अशी म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, पण हे फळ आपल्याला आजारी पाडत नाही तर अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते. डाळिंब हे केवळ चवीलाच चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पण, अनेकांना हे माहित नाही की जर आपण दररोज एक डाळिंब खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल. आजच्या लेखात आपण दररोज एक डाळिंब खाण्यास सुरुवात केल्यास आपल्या शरीरात कोणते बदल दिसून येतील हे जाणून घेऊयात.

अशक्तपणा सारख्या आजारांवर मात करते

तज्ज्ञांच्या मते, डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सर्दी आणि खोकल्यासारख्या किरकोळ समस्यांपासून संरक्षण करते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

हृदयरोगांवर देखील प्रभावी

हृदयरोगांमध्येही डाळिंब खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करतात. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास देखील मदत करते. डाळिंबाचा रस त्वचेला चमकदार बनवतो आणि केसांना मजबूत करतो. त्याचबरोबर डाळिंबाच्या सेवनाने पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.

मधुमेहावर गुणकारी

डाळिंबाच्या बियांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, ते मधुमेही रुग्णांसाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. ते थेट खाणे चांगले आहे, जेणेकरून भरपूर फायबर शरीराला मिळते. परंतु जर तुम्ही डाळिंबाचा रस काढल्यानंतर प्यायले तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होईल.

गरोदरपणात उपयुक्त

डाळिंबात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्याद्वारे गर्भधारणेदरम्यान प्लेसेंटाचे संरक्षण होते. या फळामध्ये असलेले फोलेट स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्या मुलाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे

ज्या लोकांची पचन क्षमता खूप कमकुवत आहे त्यांनी मर्यादित प्रमाणात डाळिंबाचे सेवन करावे. तसेच, हिवाळ्यात डाळिंब खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेत...
मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज