सिमला मिरची, गाजर, मटारच्या भावात वाढ

सिमला मिरची, गाजर, मटारच्या भावात वाढ

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात राज्यासह परराज्यांतून फळभाज्यांची आवक कमी होत आहे. ऊनाचा तडका फळभाज्यांना बसत असल्याने फळभाज्यांच्या आवकेवर परिणाम होत आहे. मागणी जास्त असल्याने सिमला मिरची, गाजर, मटार, भावात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर आवक जास्त असल्याने हिरवी मिरची, घेवडा, तोतापुरी कैरीच्या भावात घट झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी (दि.27) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कनर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 18 ते 20 टेम्पो, कनर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेश 4 ते 5 टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा 3 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 टेम्पो इतकी आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, भुईमूग शेंग 50 ते 60 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 75 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

कोथिंबीर, मेथीच्या भावात वाढ

गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि.27) कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख जुडी तर मेथीची 60 हजार जुडींची आवक झाली होती. बाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक वाढली होती. मात्र मागणी चांगली असल्याने मागील आठवड्यातील भाव टिकून होते. तर आवक जावक कायम असल्याने इतर सर्व पालेभाज्यांचे मागील आठवड्यातील भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

खरबूज, मोसंबी, डाळिंबाच्या भावात घसरण

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्याने खरबूज, मोसंबी आणि डाळिंबाच्या भावात घसरण झाली. पपईच्या भावात वाढ झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते. गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि. 27) फळबाजारात मोसंबी 30 ते 40 टन, संत्रा 3 ते 4 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबूज 30 ते 35 टेम्पो, चिक्कू दोन हजार बॉक्स, अननस 6 ट्रक, पेरू 150 ते 200 क्रेट, रत्नागिरी हापूस आंबा 6 ते 7 हजार पेटी, तर परराज्यातील आंबा दीड ते दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.

फुलांचे भाव टिकून

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांची आवक कमी प्रमाणात होत आहे. अक्षय्य तृतीयेच्या सणामुळे शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी राखून ठेवली आहे. त्यामुळे बाजारात फुलांची आवक घटली आहे. सोमवारी, मंगळवारी फुलांची आवक वाढणार आहे. सध्या आवक कमी होत असली तरी मागणी साधारण असल्याने फुलांचे गेल्या आठवड्यातील भाव स्थिर होते, अशी माहिती मार्केटयार्ड फूलबाजारातील फुलांचे आडतदार सागर भोसले यांनी दिली.

मासळीला मागणी कमी

देशाची पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. उन्हामुळे मासळीला मागणीही कमी झाल्याने मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेने पाच ते दहा टक्के घट झाली होती. तर, चिकन, मटण आणि गावरान, इंग्लिश अंडीचे दर स्थिर होते.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 27) खोल समुद्रातील मासळी 10 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 किलो आणि नदीच्या मासळीची 400 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून राहू, कटला आणि सिलनची सुमारे 10 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन अंड्यांचे व्यापारी रुपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय RR Vs GT – हेच हिंदुस्थानचं ‘वैभव’; 14 वर्षांच्या पोरांने दिग्गजांना फोडून काढलं, राजस्थानचा धडाकेबाज विजय
सवाई मानसिंग स्टेडियमवर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच वादळ गोंगावलं आणि राजस्थानने गुजरातचा 25 चेंडू राखत 8 विकेटने पराभव केला. वैभवने...
हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
IPL 2025 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, 35 चेंडूत झळकावले शतक
उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!
‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ईडी तपास बंद; दिल्ली कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला