काळी माशी चावल्याने अंधत्व, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संशोधन
अलीकडेच झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (झेडएसआय) रक्तशोषक काळ्या माश्यांबाबत (ब्लॅकफाय) महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. काळ्या माश्या मानवांमध्ये अंधत्व निर्माण करणाऱ्या जंतूंच्या वाहक असतात. म्हणजेच या माश्या चावल्या की दृष्टी जाऊ शकते.
‘काळ्या’ माश्या उत्तर बंगालच्या अनेक भागांत आढळतात, विशेषतः पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग आणि कालिम्पोंग जिह्यांच्या नदीकाठच्या परिसरात. त्यांना स्थानिक भाषेत ‘पिप्सा’ किंवा ‘पोटू’ माश्या म्हणून ओळखले जाते. दार्जिलिंग आणि कालिम्पोंगमध्ये वर्षभर पर्यटक येत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘‘दार्जिलिंग असो किंवा कालिम्पोंग, दोन्ही ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे आहेत.
दोन्ही पर्यटनस्थळे सामाजिक-आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. लोक वर्षभर या ठिकाणी भेट देतात. पर्यटनाचा आनंद घेताना नकळत या रक्तशोषक माश्या चावू शकतात. स्थानिक लोकांना या माश्यांचा जास्त धोका आहे. त्यातही अंधत्वाचा धोका चिंतेचा विषय आहे,’’ असे झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी सांगितले. ब्लॅक फ्लाईजमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अलीकडच्या काळात या माश्यांमुळे या प्रांतातील कुणालाही रिव्हर ब्लाईंडनेस आजाराची लागण झालेली नाही, असे संशोधकांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List