फळ विक्रेत्याच्या मुलाने अमिताभ बच्चनच्या घराजवळ सुरु केला 300 कोटींच्या आइस्क्रीमचा धंदा
मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे असं अनेकदा म्हटले जाते. या शहरात अनेकांची स्वप्नं पूर्णही होतात. काही जण मुंबईत येऊन स्टार बनतात, तर काही स्टार बनण्याच्या शर्यतीत मागे राहतात. पण मुंबईत असेही काही तारे आहेत, जे चित्रपट स्टार नसले तरी त्यांचं यश कोणत्याही चित्रपट स्टारपेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ताऱ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्या घराजवळ आइस्क्रीम दुकान टाकले होते. आज तो या दुकानातून 300 कोटींचा धंदा करतो.
ही आहे रघुनंदन श्रीनिवास कामत यांची कहाणी. त्यांनी 1984 मध्ये मुंबईच्या जुहू परिसरात नॅचरल्स आइस्क्रीम पार्लर सुरू केलं होतं. आज हा व्यवसाय 300 कोटींहून अधिक झाला आहे. या आइस्क्रीम पार्लरमधील आइस्क्रीम फळांच्या चवींनी बनलेली असतात. त्यामुळे ग्राहक खूप आकर्षित होतात. चला, रघुनंदन यांनी बिग बी यांच्या घराशेजारी दुकान कसं उघडलं यामागची कहाणी जाणून घेऊया…
वाचा: काश्मीरला यायचं असेल तर कलमा शिक, नाहीतर…; पाकिस्तानी मित्राने अभिनेत्रीला धमकी दिली
खरंतर, जिथे हे आउटलेट आहे, तिथून जवळच चित्रपट स्टार्सची घरं आहेत. रघुनंदन यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी या परिसरात दुकान उघडण्याचा प्लॅन बनवला कारण तिथे अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांसारख्या स्टार्सची घरं जवळ आहेत. लोक तिथे येतील आणि त्यांचं दुकान चालेल, असा त्यांचा विचार होता. रघुनंदन यांनी ठरवल्याप्रमाणेच झालं. दिवसेंदिवस व्यवसाय वाढत गेला आणि आज तो 300 कोटींहून अधिक झाला आहे.
वडील फळं विकायचे, मुलाने फळांपासून बनवली आइस्क्रीम
रघुनंदन श्रीनिवास कामत यांचे वडील फळं विकायचे. पण त्यांच्या मुलाने फळांपासून आइस्क्रीम बनवली. रघुनंदन यांनी फळांच्या चवींची आइस्क्रीम बनवून 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय उभा केला आहे. ते एका सामान्य कुटुंबातून आले होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडलं आणि आपल्या भावाच्या हॉटेलात काम केलं. पण तिथेच त्यांना नॅचरल आइस्क्रीमसारखं व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याची कल्पना आली.
12 फ्लेवर्स, 3.5 लाखांपासून 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय
रघुनंदन यांनी भावापासून वेगळं होऊन 3.5 लाखांच्या खर्चात 6 कामगारांसह 200 चौरस फुटांच्या दुकानात व्यवसाय सुरू केला. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं दूध, साखर आणि फळांपासून आइस्क्रीम बनवायची. सुरुवातीला 12 फ्लेवर्सने सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू 20 पेक्षा जास्त फ्लेवर्सपर्यंत पोहोचला. आता देशातील 15 शहरांमध्ये याचे 165 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. त्यांचा एकूण व्यवसाय 300 कोटींहून अधिक झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List