Sharad Pawar : पुलवामासह अनेक हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही, आज का होतेय? शरद पवार यांचा सवाल

Sharad Pawar : पुलवामासह अनेक हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही, आज का होतेय? शरद पवार यांचा सवाल

जम्मू-काश्मीर गेल्या पाच दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने येथील विकास खुंटवला आहे. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. निरपराध 26 पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अचूक टायमिंग साधलं. त्यांनी सरकारच्या निर्णयासोबत असल्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी एका महत्त्वाच्या मुद्दाला हात घातला.

शरद पवारांची थेट प्रतिक्रिया

पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, “मला माहीत नाही. यात काय तथ्य आहे. माहीत नाही. जे प्रवासी होते, त्यात त्यांनी स्त्रियांना सोडलेलं दिसतंय. पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यात दोघांचे मृत्यू झाले. त्यातील दोन लोकांच्या घरी मी गेलो होतो. घरी गेल्यावर त्या भगिनी तिथे होत्या. त्या मला सांगत होत्या. आम्हाला कुणालाही हात लावला नाही. आमच्या पुरुषांना गोळ्या घातल्या.” लोकसभेतील नेत्यांना बोलावलं होतं. आमच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे या लोकसभेच्या नेत्या आहेत. मी राज्यसभेचा आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे गेल्या होत्या.

धर्माची चर्चा आता का होतेय?

पहेलगाम येथील हल्ला ही धर्माविरोधी लढाई वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी अचूक टायमिंग साधलं. ते म्हणाले, ” यापूर्वीही अतिरेक्यांनी हल्ले केले. पुलवामात हल्ला केला. या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होतेय. घडलं ते वाईट आहे. आव्हान आहे देशाला. सक्तीने तोंड द्यावं लागेल. पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर येण्याचं काम करू नये.”

आम्ही सरकारसोबत

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोल केली. पहलगाम हे ठिकाण अधिक सेफ आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी मी गेलो होतो. सातत्याने आपले लोक जातात. हे घडलं ते पहलगामला घडलं. याचा अर्थ दहशतवादी प्रवृत्तीविरूद्ध आपण यश मिळवलंय असा निष्कर्ष आपण काढत आहोत तर तो थोडा सावध काढला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं, असा चिमटा त्यांनी काढला. पण ठीक आहे, उदाहरण पाहिलं आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला सहकार्य राहील, अशी भूमिका शरद पवार यांनी जाहीर केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; सर्व स्तरातून होतंय कौतुक पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; सर्व स्तरातून होतंय कौतुक
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये...
उन्हाळ्यात मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील पॉवरफुल!
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मायक्रोआरएनएचा रोल काय? पतंजलीचा रिसर्च काय सांगतो?
भाजपा सरकारची मच्छिमारांसंदर्भातील धोरणे मारक, मासेमारीला कृषीचा दर्जा देऊनही फायदा होणार नाही – हर्षवर्धन सपकाळ
Pahalgam Terror Attack – इन्टेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसतंय; शरद पवार यांची केंद्रावर टीका
निशिकांत दुबे यांच्या गुलमर्गमधील हाय-प्रोफाइल पार्टीची चर्चा! पहलगाम हल्ल्याआधी कडक सुरक्षेत पार पडला कार्यक्रम
हिंदुस्थानच्या अ‍ॅक्शनने पाकिस्तानमध्ये घबराट, सैन्यप्रमुख असीम मुनीरने खासगी विमानाने कुटुंबाला देशाबाहेर केले रवाना