“या” लोकांनी आंबा खाल्ल्यास होईल नुकसान! तुम्हीही यादीत आहात का? वाचा सविस्तर!
आंबा हा “फळांचा राजा” म्हणून ओळखला जातो, आणि त्याचे आरोग्यासाठी फायदेही खूप आहेत. पण लक्षात ठेवा, सर्वांनाही आंबा खाणं सुरक्षित नाही. काही लोकांसाठी त्याचा जास्त सेवन करणं नुकसान कारक ठरू शकतं. चला तर मग, कोणत्या लोकांनी आंबा खाताना विशेष काळजी घ्यावी हे पाहूया.
कोणत्या लोकांनी आंबा खाताना काळजी घ्यावी?
1. त्वचेचेया समस्या असलेले लोक: आंब्याच्या सालीत असलेल्या ‘युरुशिओल’ या रसायनामुळे काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. त्वचेला पुरळ येणे, खाज सुटणे, किंवा फोड येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे, तुम्हाला अशी समस्या असेल तर आंबा हाताळताना किंवा खाताना सावध राहा.
2. किडनीचे रुग्ण: आंब्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम हवं असलं तरी, किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी जास्त पोटॅशियम धोकादायक ठरू शकतो. यामुळे, किडनीच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आंबा जास्त न खाणे चांगले.
3. वजन कमी किंवा वाढवणारे: आंब्यात नैतिक साखर आणि कॅलोरीचे प्रमाण जास्त असते. जर तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर आंबा जपूनच खा. जास्त आंबे खाल्ल्यास वजन वाढू शकते किंवा वजन कमी होण्यात अडचण येऊ शकते.
4. पोटाच्या तक्रारी असणारे: काही लोकांना आंब्याचे जास्त सेवन केल्याने पोटात दुखणे, गॅस होणे किंवा जळजळ होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे, पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांनी आंबा खाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
5. उष्णतेचा त्रास होणारे: आंबा उष्ण प्रकृतीचा असतो. त्यामुळे, ज्यांना उष्णतेचा त्रास होतो किंवा उष्माघात होण्याची शक्यता असते, त्यांनी आंब्याचे अतिसेवन टाळावे.
आंबा खाण्याची योग्य पद्धत
1. प्रमाण राखा: आंब्याचे अति सेवन वाईट ठरू शकते. दिवसभरात एक किंवा जास्तीत जास्त दोन मध्यम आकाराचे आंबे खाणे पुरेसे आहे.
2. भिजवून खा: आंबे खाण्यापूर्वी त्यांना अर्धा तास ते एक तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे आंब्यावर असलेली हानिकारक रसायने निघून जातात आणि आंब्याची उष्णताही कमी होते.
आंबा चवीला गोड असतोच, पण त्याच्या आरोग्यवर्धक फायद्यांचा लाभ घेण्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List