एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हटल्याप्रकरणी कुणाल कामराला मोठा दिलासा

एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हटल्याप्रकरणी कुणाल कामराला मोठा दिलासा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. कामराविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरसंदर्भात त्याच्यावर कोणतीही जबरदस्तीची कारवाई होऊ शकत नाही. न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची त्याची याचिका मान्य केली. त्याचप्रमाणे याचिका प्रलंबित असताना कामराला अटक केली जाणार नाही, असं स्पष्ट केलं. परंतु या प्रकरणी कामराचा तपास सुरू राहू शकतो. जर तपास यंत्रणेला कुणाल कामराचा जबाब नोंदवायचा असेल तर स्थानिक पोलिसांच्या मदतीने चेन्नईमध्ये त्यांनी चौकशी करावी, असंही न्यायालयाने म्हटलंय. त्याचसोबत जर या याचिकेदरम्यान आरोपपत्र दाखल केलं गेलं, तर संबंधित न्यायालय (ट्रायल कोर्ट) या याचिकेदरम्यान कामराविरुद्ध कारवाई करणार नाही, असं न्यायालयाने नमूद केलंय.

मुंबई उच्च न्यायालयाने 16 एप्रिल रोजी कामराला निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवलं होतं. कामराने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं की तो तमिळनाडूचा रहिवासी आहे आणि शोनंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने तो महाराष्ट्रात येण्यास घाबरत आहे. त्यावरून न्यायालयाने मुंबई पोलिसांना चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबईतील एका शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटल्याने कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी हा शो झाला होता, तिथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली होती. या शोदरम्यान कामराने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील एका गाण्याची नक्कल करून त्यात शिंदेंना ‘गद्दार’ म्हटलं होतं.

“याप्रकरणी पोलिसांनी जी कलमं लावली आहेत, ती कायदाबाह्य आहेत. तक्रारदार मुरजी पटेल हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे हे प्रकरण ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’मध्ये मोडतं. कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात वक्तव्य केल्याचा पटेल यांचा आरोप हास्यास्पद आहे. शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर पडली, असा त्याच्या गाण्यात उल्लेख होता. या प्रकरणात ज्यांची बदनामी झाल्याचा आरोप आहे, त्यांनी तक्रार केली नाही आणि ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची बदनामी झाल्याचं म्हटलं नाही. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं हा सत्तेचा गैरवापर आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करताना कोणताही तपास करण्यात आला नाही. या प्रकरणात प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली नाही”, असा युक्तीवाद कामराच्या वकिलांनी केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती Pahalgam Terror Attack – सुरक्षेत चूक, इन्टेलिजन्स फेल… पहलगाम हल्ल्यावर काँग्रेसची केंद्रावर प्रश्नांची सरबत्ती
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुखावला गेला...
पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल
फळ विक्रेत्याच्या मुलाने अमिताभ बच्चनच्या घराजवळ सुरु केला 300 कोटींच्या आइस्क्रीमचा धंदा
काश्मीरला यायचं असेल तर कलमा शिक, नाहीतर…; पाकिस्तानी मित्राने अभिनेत्रीला दिला होता इशारा
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा काळे झेंडे दाखवून कोल्हापूरात निषेध; शेतकरी कर्जमाफीवरून शेतकरी अजूनही संतप्त
दिल्लीत चाललंय काय? आणखी एका न्यायाधीशांना मिळाली जीवे मारण्याची धमकी
Pahalgam Terrorist Attack – भावाला भावा विरुद्ध लढवण्याचा दहशतवाद्यांचा डाव! पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया