मी मेल्यावर मला कोणीही खांदा देणार नाही… या सुपरस्टारचे शब्द खरे ठरले, मुलगी वडिलांचा चेहराही पाहू शकली नाही
असे म्हटले जाते की अनेकांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागते. ते स्वत:च्या मृत्यूविषयी अनेक गोष्टी सांगतात आणि या गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर खऱ्या देखील ठरतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्यानेही स्वतःबद्दल असेच काहीसे सांगितले. त्याच्या निधनानंतर त्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या.
काही वर्षांपूर्वी जगाने कोरोना महामारी पाहिली होती. त्या काळात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. त्या काळात लोकांना योग्य प्रकारे अंतिम निरोपही देण्यात आला नाही. कोरोना काळात हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचेही निधन झाले. त्यांच्या मृत्युपूर्वी त्यांनी म्हटले होते की जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या मृतदेहाला कोणीही खांदा देणार नाही. अभिनेत्याचे हे विधान नंतर खरे झाले. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी देखील त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही. ती शेवटच्या वेळी तिच्या वडिलांचा चेहरा पाहू शकली नाही.
वाचा: दादा कोंडके यांची झलक दिसते सूरजमध्ये; ‘झापुक झुपूक’मधील गाणे पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली नाराजी
२०१७ मध्ये, ऋषी कपूर यांनी ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल दुःख आणि निराशा व्यक्त केली. खरंतर, विनोद खन्नासारख्या अभिनेत्याच्या अंत्यसंस्काराला खूप कमी लोक उपस्थित होते. त्यानंतर ऋषीने एक्स (पूर्वी ट्विटर) वर ट्विट केले होते. नाराजी व्यक्त करताना त्यांनी लिहिले, “लज्जास्पद. या पिढीतील एकही अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला नाही, त्यांच्यासोबत काम करणारे देखील नाही. सर्वात आधी तर आदर करायला शिका.”
याशिवाय, दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “असे का? जेव्हा मी मरेन तेव्हा मला तयार राहावे लागेल. कोणीही मला खांदा देणार नाही. मला आजच्या तथाकथित स्टार्सचा खूप राग आहे.”
ऋषी कपूरची भविष्यवाणी खरी ठरली
विनोद खन्ना यांच्या निधनानंतर तीन वर्षांनी, ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि काही जवळच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, त्यांच्या अंत्यसंस्काराला इच्छा असूनही कोणीही उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ऋषी कपूर त्यांच्या मृत्यूबद्दल जे सांगितले होते ते खरे ठरले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List