साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठा ट्विस्ट
'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामींची न भूतो न भविष्यति लीला सध्या उलगडत असून जिथे स्वामी अचानक खूप आजारी पडले आहेत. स्थानावर कमालीची अस्वस्थता आहे.
साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार कुणालाच काही कळत नाहीये. स्वामींवर कुठल्याच औषधाचा प्रभाव होत नाहीय. भक्तगण हतबल होतात.
ही स्वामींची लीला आहे हे बाळपाला जाणवतं आहे पण यावर उपाय काय हे मात्र त्याला कळत नाहीये. तो स्वामींना तशा अवस्थेत पाहू ही शकत नाहीय.
यातच बार्शीच्या कुलकर्णी वैद्य आणि त्यांची मुलगी उर्मिला यांची गोष्ट सुरू होते. उर्मिला दत्तभक्त आहे, पण घरची गरीबी आहे. तिला विचित्र स्वप्नं पडतात, ज्यात राजवाडा आणि राजा दिसतो. उर्मिला बेचैन होते, आणि दत्तगुरुंना उत्तरं मागते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List