घाटकोपरच्या गृहनिर्माण सोसायटीत मराठी माणसाविरोधात पोल, मुंबईत काय चाललय? मांसाहाराचा वाद
मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी मागच्या काही महिन्यात ठाणे, कल्याण येथे अशा घटना घडल्या आहेत. घाटकोपरच्या गृहनिर्माण सेसायटीत हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या बद्दल कळताच त्यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरला. त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला कॅमेऱ्यासमोर जाब विचारला. घाटकोपर येथे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद चांगलाच पेटला आहे. तेथील एका गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं समोर आलय. शाह नावाच्या व्यक्तीने या संबंधित मराठी कुटुंबाला बरंच सुनावलं. ‘तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो’ असे त्याने मराठी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तिथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना आपल्या स्टाइलमध्ये समज दिली. “तू त्यांच्यामागे लोमतेगिरी करत फिरतोस, म्हणून ते तुला गोड वाटतात. हा खूप त्यांची बाजू घेतो, एक सोसायटीत आहे, कार्यक्रमाच्यावेळी कोणाचा जात, धर्म, राज्य बघितलं जातं का? मराठी लोकांनी कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही का?” असा सवाल मनसैनिकांनी त्या पदाधिकाऱ्याला विचारला. त्यावर त्याने राजीनामा पाठवून दिलाय एवढच सांगितलं.
‘तू XXXX चोळतोस, म्हणून त्यांच्यामागे….’
“सोसायटीत कार्यक्रम होतो, तेव्हा अख्खी बिल्डिंग उतरतेना, मग गुजराती सोडून मराठी लोकांनी त्यात सहभागी व्हायचं नाही का?. हा काय प्रकार आहे. काय बोलतो, हा भेदभाव होत नाही, तू XXXX चोळतोस, म्हणून त्यांच्यामागे फिरत असतोस. सगळे मराठी तुझ्यासारखे नाहीत. रात्री सूट दिली म्हणून शहाणा झालास का?. व्हॉट्स अप ग्रुप आहे, तिथे मराठी कुटुंबाविरोधात पोल घेतला, त्यावेळी तिथे याने का विरोध केला नाही”असा सवाल मनसैनिकांनी त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला विचारला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List