Manoj Kumar- यांच्या सुपरहिट ‘उपकार’ चित्रपटाची कथा केवळ 24 तासांमध्ये लिहिण्यात आली होती! वाचा सविस्तर

Manoj Kumar- यांच्या सुपरहिट ‘उपकार’ चित्रपटाची कथा केवळ 24 तासांमध्ये लिहिण्यात आली होती! वाचा सविस्तर

बॉलिवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख मिळवलेले, अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर चित्रपट आणि मनोज कुमार ही भट्टी त्याकाळी अगदी मस्त जुळून आली होती. म्हणूनच त्यांना भारत कुमार असेही म्हणत.

मनोज कुमार यांनी ‘क्रांती’, ‘पूरब और पश्चिम’, ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’ असे चित्रपट बनवले होते. हे चित्रपट केवळ मनोरंजनाच्या हेतूने बनवण्यात आले नव्हते. तर या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी देशभक्तीसोबतच, समाजातील उणीवांवरही ते भाष्य करत असत. ‘उपकार’ या त्यांच्या नावाजलेल्या चित्रपटाची कथा ही त्यांनी अवघ्या 24 तासांत लिहिली होती. हिंदुस्थानचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी बनवण्यास सांगितले होते.

 

1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होते. या काळात लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. भारताने हे युद्ध जिंकले होते. या विजयानंतर, योगायोगाने लाल बहादूर शास्त्री आणि मनोज कुमार यांची दिल्लीत भेट झाली होती. याच बैठकीत लाल बहादूर शास्त्री यांनी सैनिक आणि शेतकरी या दोन्हींवर आधारीत चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला होता.

मनोज कुमार 1965  मध्ये दिल्लीत ‘शहीद’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला उपस्थित होते. लाल बहादूर शास्त्री देखील या प्रदर्शनाला उपस्थित होते. दोघेही भेटले आणि लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांच्या संभाषणाचा परिणाम म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यावर चित्रपट बनवण्याचे ठरवले होते. लाल बहादूर शास्त्रींच्या बोलण्याने मनोज कुमार प्रभावित झाले आणि त्यांनी लगेच शेतकऱ्यांवर एक चित्रपट बनवण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर ते दिल्लीहून मुंबईला रवाना झाले. या 24  तासांच्या प्रवासामध्येच त्यांनी देशाचे सैनिक आणि शेतकऱ्यांवर आधारित चित्रपटाची कथा लिहिली आणि त्याचे नाव ‘उपकार’ ठेवले.

मनोज कुमारचा ‘उपकार’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता
1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उपकार’मध्ये मनोज कुमारसह आशा पारेख, प्राण आणि प्रेम चोप्रा यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यावेळी या चित्रपटाने 6.80 कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याचे IMDb रेटिंग 7.6 आहे. ‘मेरे देश की धरती’ हे उपकार चित्रपटातील गाणे महेंद्र कपूर यांनी गायले होते. चित्रपटातील गाणे सदाबहार ठरले असून आजही हे गाणे हिट आहे. हे गाणे अजूनही 15 ऑगस्ट किंवा 26  जानेवारी किंवा कोणत्याही देशभक्तीपर कार्यक्रमात ऐकायला मिळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement