दादा कोंडके यांची झलक दिसते सूरजमध्ये; ‘झापुक झुपूक’मधील गाणे पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
गुडघ्यापर्यंतच्या चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी असणारे अभिनेते दादा कोंडके हे आजची प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आजही प्रेक्षक दादा कोंडके यांचे सिनेमे आवडीने पाहतात. पण सर्वांना बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणला पाहून दादा कोंडके यांची आठवण आली आहे. अनेकांनी त्याचा परफॉर्मन्स पाहून दादा कोंडके सारखी स्टाईल असल्याचे म्हटले आहे.
काय आहे गाणे
सूरज चव्हाणचा लवकरच ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील नवं रोमॅन्टिक गाणं ‘पोराचा बाजार उठला रं’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात सूरजसोबत अभिनेत्री जुई भागवत आणि इंद्रनील कामत दिसत आहे. गाण्याच प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. जुईवर सूरज आणि इंद्रनील दोघांचाही जीव जडला आहे. तसेच या गाण्यात सूरज चव्हाणची हुकस्टेप देखील आहे. गाण्यातील सूरजचा रोमँटिक अंदाज पाहून प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
‘पोराचा बाजार उठला रं’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. एका यूजरने, ‘दादा कोंडके ची झलक आहे सुरज… मराठी फिल्ममधला पुढचा सुपरस्टार’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘दादा कोंडकेंची झलक दिसते सूरजमध्ये… हे गाणं अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने सूरजच्या अभिनयाचे कौतुक करत ‘एवढा चांगला अभिनय करतो.. मस्तच’ असे म्हटले आहे.
सूरजच्या आगामी सिनेमाविषयी
सूरज चव्हाणसोबत ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात एक धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरजने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली. त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पद्यावर पाहायला मिळणार आहे. एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे, मराठी मातीतल्या या साध्या भोळ्या सूरजसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List