महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी फुल्ल
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटनस्थळं पुन्हा एकदा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. सलग आलेल्या वीपेंड आणि उन्हाळी सुट्टयांचा योग जुळून आल्याने या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. थंड व आल्हाददायक हवामान, हिरव्यागार दऱ्या-खोऱ्या, धुक्याची चादर आणि नयनरम्य दृश्यांनी नटलेल्या या भागाने पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी धुक्याची पडलेली दाट चादर आणि उबदार थंडीमुळे येथे निसर्गसौंदर्याची अनुभूती अधिकच गहिरी होत आहे. वेण्णा लेकवर बोटिंगचा आनंद लुटणारे पर्यटक, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागलेली गर्दी, आणि केट्स पॉईंट, ऑर्थरसीट पॉईंट, लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी दिसत आहे. शिवरायांच्या शौर्याची आठवण करून देणारा किल्ले प्रतापगडसुद्धा पर्यटकांच्या यादीत अग्रक्रमावर आहे.
n येत्या मेपासून राज्यस्तरीय पर्यटन महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खास महाबळेश्वरची लाकडी काठी, कलात्मक हस्तकला वस्तू, पारंपरिक चप्पल आणि खमंग चना चिक्की, फज यांची चव घेण्यास पर्यटकांचा ओढा वाढला आहे. बाजारपेठेचे सुशोभीकरण युद्धपातळीवर सुरू असून पर्यटन महोत्सवाआधीच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List