मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा ‘या’ दिवसापासून बंद; नेमकं कारण काय?

मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा ‘या’ दिवसापासून बंद; नेमकं कारण काय?

Mumbai Water Supply : सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीने घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणीबाणी येण्याची शक्यता आहे. कारण आज (9 एप्रिल) मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी 1500 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे. त्यामुळे अटींमध्ये सूट मिळायला हवी. नाईलाजाने हा पाणीपुरवठा बंद करावा लागत आहे. यामुळे मुंबईवर मोठा होईल, अशी प्रतिक्रिया टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतील विविध भागात आधीच पाणीपुरवठा सुरळीत नसताना वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत हॉस्पिटल, गार्डन, रस्त्यांची कामे , उड्डाणपुलाची कामे, इमारती, आरएमसी मिक्सर प्लांट, डीप क्लीनिंग , IPL क्रिकेट मॅच यासाठी पाण्याची मोठी गरज भासते. असे असताना सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या या निर्णयामुळे मुंबईत मोठी पाणीटंचाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सेंट्रल ग्राउंड वॉटर अॅथॉरिटीच्या नियमावली कोणत्या आहेत?

1- 200 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक आकाराची जमीन टँकरमालकाकडे आवश्यक.

2- टँकरच्या मालकीचा/लीजचा पुरावा आवश्यक

3- सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीचे एनओसी प्रमाणपत्र आवश्यक

4- रोजचा उपसा मोजण्यासाठी ‘डिजिटल वॉटर फ्लो मीटर’ बंधनकारक

5- टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या ‘बीआयएस’ दर्जा मानकाचे पालन आवश्यक.

6- भूजल उपसण्याचे प्रमाण

दरम्यान, आता या सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या या निर्णयानंतर आता नेमका काय होणार? प्रशासन काही प्रतिबंधात्मक उपाय करणार का? तसेच काही पर्यायी व्यवस्था केली जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तलावांत 33 टक्के पाणीसाठा

दुसरीकडे कडक उन्हाळ्यात मुंबईला ज्या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो, त्या धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. सध्या मुंबईला पाणी पुरवणाऱ्या एकूण सात तलावांमध्ये फक्त 33 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

गेल्या वर्षापासून 10 टक्क्यांनी पाणीकपात

मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या तलावांतून मुंबईला पाणी पुरवले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईचे विस्तारीकरण होत असल्यामुळे लागणाऱ्या पाण्याचीही मागणी वाढली आहे. त्यामुळेच आता पाणीपुरवठ्यावर तणा येत आहे. गेल्या वर्षांपासून मुंबईला 10 टक्क्यांनी पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. असे असताना या वर्षीही मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांत फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी मे महिन्यात पाणीकपातीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

झोपताना तोंड उघडं ठेवताय? सावध व्हा; ही छोटी सवय बनू शकते मोठा आजार झोपताना तोंड उघडं ठेवताय? सावध व्हा; ही छोटी सवय बनू शकते मोठा आजार
आपण कधी झोपेत तोंड उघडं ठेवून झोपणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं आहे का? किंवा सकाळी उठल्यावर तोंड कोरडं, गळा खवखवणारा आणि...
परळीत EVM सोबत छेडछाड, गप्प राहण्यासाठी दिले 10 लाख रुपये; बीडचे निलंबित PSI रणजीत कासलेंचा गौप्यस्फोट
आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभागप्रमुखांना भरावा लागेल दंड, वाचा सविस्तर
Mumbai News – चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित
IPL 2025 – वानखेडेवर मुंबईच्या शिलेदारांचाच दबदबा, हैदराबादला 4 विकेटने नमवलं
‘बाळासाहेब असते तर यांना चाबकानं फटकारलं असतं’, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
शाळेत ‘हिंदी’ची सक्ती, ‘जर राज ठाकरेंनी विरोध केला तर आम्ही…’, सदावर्तेंंचा थेट इशारा