भगवान रामांची भूमिका साकारून प्रसिद्ध झाले हे मुस्लिम कलाकार, प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य
भगवान रामांची भूमिका आजपर्यंत अनेक कलाकारांनी साकारली आहे. आणि त्या नक्कीच तेवढ्या प्रसिद्धही झाल्या. आजपर्यंत तब्बल 15 कलाकरांनी प्रभू रामांची भूमिका साकारली आहे. पण यांपैकी चर्चा झाली ती मुस्लिम कलारांची. या कलाकारांनी प्रभू रामांची भूमिका केली अन् प्रसिद्धीच्या झोतात आले. चला तर पाहुया प्रभू रामांची भूमिका साकारणारे ते कलाकार कोणते आहेत ते.
सिराज मुस्तफा खान
1997 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘जय हनुमान’ या मालिकेत सिराज मुस्तफा खान यांनी भगवान रामांची भूमिका साकारली होती.त्यानंतर नक्कीच त्यांची तेवढी चर्चा होऊ लागली होती. त्यांची भूमिका लोकांच्या मनावर कोरली गेली.
सलीम घौस
2022 मध्ये निधन झालेले सलीम गौस यांनी 1988 मध्ये प्रसारित झालेल्या ‘भारत एक खोज’ मध्ये भगवान रामांची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
गगन मलिक
गगन मलिकने ‘रामायण’ जे 2012 मध्ये ही मालिका आली होती. आणि ‘संकटमोचन महाबली हनुमान’ ही मालिका 2015 मध्ये आली होती. या टीव्ही शोंमध्ये भगवान रामांची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की प्रेक्षक त्याचे फॅन झाले. त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. आता या तिघांव्यतिरिक्त अजून कोणत्या कलाकारांनी प्रभू रामांची भूमिका साकारली होती ते.
अरुण गोविल
1987 मध्ये, अरुण गोविल रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत भगवान रामांच्या भूमिकेत दिसले. त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय झाली की लोक त्यांची पूजा करू लागले होते. ही भूमिका त्याची कायमची ओळख बनली.
जितेंद्र
जंपिंग जॅक म्हणून प्रसिद्ध असलेले जितेंद्र ‘लव कुश’ चित्रपटात भगवान रामांच्या भूमिकेत दिसले होते. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अरुण गोविल लक्ष्मणच्या भूमिकेत दिसले होते.
नितीश भारद्वाज
1988-1990 दरम्यान चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत भगवान कृष्णाच्या भूमिकेत दिसणारे बी. आर. नितीश भारद्वाज 2000 मध्ये ‘विष्णु पुराण’ आणि 2002 मध्ये ‘रामायण’ या मालिकेत भगवान रामांच्या भूमिकेत दिसले.
गुरमीत चौधरी
2008 मध्ये, ‘रामायण’ हा शो पुन्हा टीव्हीवर सुरू झाला आणि यावेळी गुरमीत चौधरी या शोमध्ये रामाच्या भूमिकेत दिसला.
सौरभ राज जैन
‘देवों के देव… महादेव’ या मालिकेत सौरभ राज जैन भगवान रामांच्या भूमिकेत दिसला होता.
आशिष शर्मा
2015 मध्ये प्रसारित झालेल्या ‘सिया के राम’ या मालिकेत आशिष शर्मा भगवान रामांच्या भूमिकेत दिसला होता.
प्रभास
2013 मध्ये, प्रभास दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात भगवान रामांच्या भूमिकेत दिसला होता.
रणबीर कपूर
दिग्दर्शक नितेश तिवारी ‘रामायण’ हा चित्रपट बनवत आहेत, ज्याचा पहिला भाग 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हिमांशू सोनी
हिमांशू सोनी ‘राम सिया के लव कुश’ सारख्या मालिकांमध्ये भगवान रामांच्या भूमिकेत दिसला आहे.
नंदमुरी बालकृष्ण
2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्री रामा राज्यम’ या तेलगू चित्रपटात नंदामुरी बालकृष्ण यांनी भगवान रामांची भूमिका साकारली होती.
ज्युनियर एनटीआर
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ या तेलुगू चित्रपटात ज्युनियर एनटीआर भगवान रामांच्या भूमिकेत दिसला होता. त्यावेळी तो 14 वर्षांचा होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List