सैफ अली खानला कानशिला मारली की नाही? मलायका अरोराविरुद्ध वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?

सैफ अली खानला कानशिला मारली की नाही? मलायका अरोराविरुद्ध वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?

Saif Ali Khan – Malaika Arora : अभिनेता सैफ अली खानच्या मारहाण प्रकरण तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलं आहे. या प्रकरणात, हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. नुकताच, अमृता अरोरा हिने न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवला आहे. संबंधित प्रकरणी मलायका अरोरा देखील न्यायालयात हजर राहणार होती, पण ती आली नाही. यामुळे अभिनेत्री विरोधात वॉरेंट जारी करण्यात आला आहे…

सांगायचं झालं तर, 22 फेब्रुवारी 2012 रोजी मलायका अरोरा देखील सैफ अली खानसोबत हॉटेलमध्ये उपस्थित होती. मुख्य न्यायदंडाधिकारी के एस झावर सध्या या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदवत आहेत. अमृता अरोरा नंतर मलायकाला साक्ष नोंदवली जाणार होती, पण अभिनेत्री कोर्टात हजर न राहिल्यामुळे वॉरेंट जारी करण्यात आला आहे.

मलायकाविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

मिळालेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी मलायका विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्रीला सोमवारी कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या प्रकरणात मलायका अरोराविरुद्ध पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 29 एप्रिल रोजी होईल.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 2012 मधील आहे. जेव्हा सैफ अली खान, करीना कपूर, मलायका अरोरा करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि त्यांचे काही जवळचे मित्र हॉटेलमध्ये डिनर करत होते. तेव्हा हॉटेलमध्ये आलेला उद्योजक इकबाल मीर शर्मा याच्यासोबत अभिनेत्याची भांडणं झाली. सैफवर उद्योजक आणि त्याच्या सासऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शर्माने अभिनेता आणि त्याच्या मित्रांमधील जोरदार वादाचा निषेध केला तेव्हा सैफने त्याला धमकावले आणि नंतर उद्योजकाच्या नाकावर मुक्का मारला ज्यामुळे त्याच्या नाकातून रक्त येवू लागलं.

अमृता आरोराची प्रतिक्रिया

पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर सैफ याच्यासबोत आणखी दोन लोकांना अटक करण्यात आली. पण त्यांची जामिनावर सुटका झाली. सैफ अली खानवरील हल्ला खटला गेल्या 13 वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी अमृता अरोराने प्रतिक्रिया दिला आहे. आता याप्रकरणी मलायका अरोरा काय म्हणते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार
एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची...
आम्ही मराठी वाचणार… शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
एक्सप्लेनेड लिबरलला विजेतेपद
अभिनेत्याची फसवणूक; एकाला अटक
आजपासून कुमार गटाच्या 24 संघांमध्ये संघर्ष
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे एक पाऊल पुढे, वर्षभरात 16 स्थानकांवर उभारले नवीन फूटओव्हर ब्रिज; मुंबईतील सात स्थानकांचा समावेश
महिला व्यावसायिकेची ऑनलाईन फसवणूक