पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
बॉलीवूडमध्ये ‘कास्टिंग काउच’चे प्रकार होत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. परंतु चांगल्या यशानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला ‘कास्टिंग काउच’ प्रकाराला समोरे जावे लागले होते. 2002 मध्ये आलेल्या ‘ये दिल आशिकाना’ चित्रपटातील जिविधा शर्मा हिलाही ‘कास्टिंग काउच’ प्रकाराला समोरे जावे लागले होते. ‘ये दिल आशिकाना’ या यशस्वी चित्रपटात आघाडीची अभिनेत्रीची भूमिका तिने केली. त्यानंतर ती एका रात्रीतून स्टार झाली. पहिल्याच चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर जिविधा शर्माचा बॉलीवूडमधील संघर्ष संपला नव्हता. ती ज्या ठिकाणी कामासाठी जात होती, त्या ठिकाणी ‘कॉम्प्रोमाइज’ करण्याचा सल्ला तिला दिला जात होता. एका मुलाखतीतून तिने हा धक्कादायक खुलासा उघड केला.
‘ये दिल आशिकाना’ या चित्रपटात जिविधा शर्मासोबत करण नाथ नायक होता. या चित्रपटातील गाण्यांनी त्या काळात धूम माजवली होती. जीविधा शर्मा हिने नुकतीच ‘द ललनटॉप’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने इंडस्ट्रीत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल मोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली, ‘ये दिल आशिकाना’नंतर मी जवळपास प्रत्येक दिग्दर्शकाला भेटले. माझा तो चित्रपट सिल्व्हर ज्युबिली होता. मी हॉट प्रॉपर्टी बनली होती. प्रत्येकाला माझ्यासोबत काम करायचे होते. मी सर्वांना भेटली. मी कोणाचेही नाव घेणार नाही. पहिल्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतरही मी कामासाठी इकडे तिकडे धावत होते. दुसरा चित्रपट मिळवणे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यानंतर मी एनटीआरसोबत एक तेलुगू चित्रपट साइन केला होता.
सर्वांनी कॉम्प्रोमाइज करण्याचे सांगितले…
जिविधा म्हणाली, मी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्यास भेटली. परंतु तडजोड करू न शकणे माझ्यासाठी अडसर ठरत होते. मी तडजोड करु शकत नव्हते. मी आपल्या आत्मसम्मानासोबत काम करेल, असे ठरवले होते. तुम्ही मला 24/7 काम करायला लावा. माझ्याकडून जसा परफॉर्म हवा असेल तसा करुन घ्या. पण मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. माझा हा निर्णय माझ्या करिअरमध्ये अडथळा ठरत होता. त्या काळात ज्यांनाही मी भेटली सर्वांनी कॉम्प्रोमाइज करण्याचे सांगितले.
मुलाखतीत जिविधा म्हणाली, कोणी म्हणाले, तुम्हाला काम करायचे आहे. सर्व सेट आहे. कॉम्प्रोमाइज आहे ना? आधी मला कॉम्प्रोमाइज समजत नव्हते. परंतु हळहळू हा सर्व प्रकार समजला. काही लोकांनी अगदी बोलत बोलता जवळ येण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना खांद्यावर हात ठेवला. मला तू खूप आवडतोस सांगितले. मी नकार देत राहिल्यावर एकामागून एक संधी मी गमावू लागले. ये दिल आशिकना चित्रपटाच्या यशानंतर मला या सगळ्याचा सामना करावा लागला. मला कोणत्याही अवॉर्ड शोमध्येही बोलवले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List