‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा मजेदार एपिसोड; एजे-लीलासह कुटुंबीयही थिरकरणार

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा मजेदार एपिसोड; एजे-लीलासह कुटुंबीयही थिरकरणार

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटरला’ या मालिकेत एकाचवेळी खूप काही घडामोडी घडत आहेत. घरात गुढीपाडवा साजरा होत आहे आणि त्यासोबतच घरात एक गोड बातमीही येणार आहे. तर दुसरीकडे एजेच्या पहिल्या बायकोने म्हणजेच अंतराने मालिकेत पुन्हा एण्ट्री घेतली आहे. अंतराच्या येण्याने एजे-लीलाच्या नात्यात काय बदल घडतील हे येणारा वेळच सांगेल. पण सध्या गुढीपाडवा दोघे एकत्र साजरा करत आहेत. एजे आणि लीला गुढी उभारतात. सकाळपासून लीलाच्या हातून काही ना काही विचित्र गोष्टी घडतायत, त्यामुळे सरोजिनीला वाटतंय काहीतरी अपशकुन घडणार आहे. एजे, लीला आणि सरोजिनी मंदिरात गेले असताना सरोजिनीला अचानक अंतरा दिसते. तर एजेला वाटतंय की लीला त्याचा वाढदिवस विसरली आहे. पण लीला जेव्हा त्याच्यासाठी केक घेऊन येते, जो पुन्हा एजेच्या चेहऱ्यावर पडतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात.

दोघंही आनंदी आहेत. लीला एजेच्या वाढदिवसासाठी ग्रँड सेलिब्रेशनचा प्लॅन करते. घरात गोड बातमी आहे ज्यासाठी लीला एका खास पोस्टर बनवते आणि ती एजेला ते उघडण्यास सांगते. त्यामध्ये कुटुंबातील सर्व स्त्रिया एका बाळाची काळजी घेताना दिसत आहेत. या खास प्रसंगी एजे 51% व्यवसाय समभाग लीलाला देण्याची घोषणा करतो. घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना सर्व कुटुंब मिळून एक खास गाण्यावर डान्स करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

लीला म्हणजेच वल्लरी विराजने या गाण्याच्या शूटचा किस्सा ऐकवताना सांगितलं, ‘धिक ताना धिक ताना हे गाणं आम्ही शूट केलं. ते शूट करताना आम्हाला खूप मजा आली. आम्ही ते संपूर्ण गाणं एका तासात शूट केलं. आमच्या मालिकेत सर्वांना नाचायला खूप आवडतं. त्यामुळे हे गाणं शूट करणं आमच्यासाठी एक मजेशीर गोष्ट होती. आमचा कोरिओग्राफर सनीने आम्हाला डान्स स्टेप्स दाखवल्या आणि आम्ही पटापट करत गेलो, तेही वन-टेकमध्ये. एक गमतीचा किस्सा सांगायचा झाला तर आमचा डान्स सुरू असताना भारती ताई आणि राकेश बापट यांना वाटलं की सगळे डान्स करत आहेत. पण ते दोघे नाहीत. मग भारती ताई, सनीला म्हणाल्या की आम्हाला का बाजूला उभं केलं आहे? पहिल्यांदा आमची पूर्ण कास्ट एकत्र डान्स करत होती. प्रत्येक शॉटनंतर आम्हाला फक्त आणि फक्त हसू येत होतं. आम्हा सगळ्यांना प्राण्यांचे मुखवटे दिले होते आणि लहान मुलांची खेळणीही आणली होती. आम्ही शूट कट झाल्यावर त्या खेळण्यांसोबत खेळत होतो.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा निर्णय ! पुनर्विकास प्रकल्पात असहकार पुकारणाऱ्या धारावीकरांना मुदतवाढ नाही मोठा निर्णय ! पुनर्विकास प्रकल्पात असहकार पुकारणाऱ्या धारावीकरांना मुदतवाढ नाही
धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या वेगाने सुरू आहे. मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी होण्यासाठी 15 एप्रिल 2025 पर्यंत सादर केलेल्या कागदपत्रांची...
आगीचे लोळ होरपळवणार, पण अजून येणार मोठं अस्मानी संकट, आता होणार कहर, IMD चा इशारा काय?
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी..’; महेश मांजरेकरांनी सलमानला म्हटलं ‘देवमाणूस’
‘माझे तिच्या एवढेही मोठे नाहीयेत…’; नीना गुप्तांची प्रसिद्ध अभिनेत्रीवर थेट कमेंट, सर्वांनी केले कान बंद
‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..
बेकायदा पिस्तूल बागळणाऱ्या दोघांना साताऱ्यात अटक
कार्य कोणतेही असो, ‘बिचुकले’त दिला जातो पर्यावरणाचा संदेश; गावाची पंचक्रोशीत होतेय चर्चा