छत्रपती संभाजी महाराजांना अलोट जनसागराचे अभिवादन!
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीची महापूजा, अभिषेक, मूक पदयात्रा, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद, विविध पुरस्कार वितरण अशा उपक्रमांद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी अलोट जनसागर लोटला!
हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र तुळापूर व शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शंभुभक्तांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. सकाळी 10नंतर शंभुभक्तांचा तर जनसागरच लोटला होता. सर्वत्र शंभुराजेंचा जयघोष आवाज घुमत होता. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, आमदार महेश लांडगे, आमदार माउली कटके, पेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, माजी आमदार अशोक पवार आदी उपस्थित होते.
z पहाटे तुळापूर व वडु येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. सकाळी 7 वाजता मूक पदयात्रा काढण्यात आली. 9 ते 11 ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांचे प्रवचन झाले. वढू बुद्रुक महंत प.पू. श्रीरामगिरी महाराज यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार व रोख 51 हजार रुपये देण्यात आले. आमदार महेश लांडगे यांना श्री शंभुतेज पुरस्कार, तर सुधीर बाळसराफ व महेश भुईवार यांना शंभुसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List