राजघराण्यातील मुलगी… बॉलिवूड पदार्पण करताच झाली स्टार, फक्त एका MMS स्कँडलमुळे रातोरात करिअर उद्ध्वस्त
बॉलीवूड अभिनेत्रीच्या आयुष्याची कहाणी: स्टार किडच्या कुटुंबाचा केवळ चित्रपटांशीच नाही तर राजघराण्याशीही खोल संबंध आहे. तिच्या सुपरहिट पदार्पणानंतर, लोक तिला तिच्या आजीसारखी मोठी स्टार मानू लागले. पण एका एमएमएस स्कँडलनंतर ती इतकी कुप्रसिद्ध झाली की तिचे उज्ज्वल करिअर एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. बॉलिवूडमधील अशी एक अभनेत्री जिची बहीण, आई आणि आजी देखील प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. ती देखील राजघराण्यातील एक मुलगी आहे. तिने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा नक्कीच तिला यशही मिळालं. तिला चित्रपटसृष्टीतील पुढची मोठी स्टार म्हणून ओळखले जात होते. पण एका एमएमएस स्कँडलने सगळं उध्वस्त केलं.
राजघराण्यातील अभिनेत्री
ही अभिनेत्री म्हणजे रिया सेन. रियाचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. रिया कूचबिहारच्या राजकुमारी इला देवी यांची मुलगी आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांची भाची आहे. तिची आई मूनमून सेन आणि आजी सुचित्रा सेन या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रियाला रायमा सेन नावाची एक मोठी बहीण देखील आहे.
सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
रियाने वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने तिच्या आईसोबत ऑनस्क्रिनवर मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर 1991 मध्ये तिने ‘विष कन्या’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. रियाला खरी ओळख फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या गाण्यात दिसल्यानंतर मिळाली. तिने ‘स्टाईल’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
‘स्टाईल’ हा चित्रपट कमी बजेटचा होता ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अभिनेत्रीचा पुढचा चित्रपट ‘झंकर बीट्स’ देखील मध्यम बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि तो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. 2005 मध्ये, रिया आणि तिचा प्रियकर अश्मित पटेल यांची एक कथित एमएमएस क्लिप व्हायरल झाली.
एमएमएस स्कँडलनंतर रियाच्या बॉलिवूड करिअरवर वाईट परिणाम झाला
व्हिडिओमध्ये रिया आणि अश्मित किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही ही क्लिप बनावट असल्याचे सांगितलं होतं, परंतु नंतर अश्मित ‘बिग बॉस’मध्ये याबद्दल बोलताना दिसला. एमएमएस स्कँडलनंतर रियाच्या बॉलिवूड करिअरवर वाईट परिणाम झाला. रिपोर्टनुसार ती ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘कयामत’ सारख्या यशस्वी चित्रपटांचा भाग होती परंतु त्यामुळे तिच्या कारकिर्दीला फारसा फायदा झाला नाही. हळूहळू रिया बॉलिवूडपासून दूर गेली
रियाच्या कामाबद्दल
एमएमएस स्कँडलनंतर रियाने बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले. काही फ्लॉप चित्रपटांनंतर, रियाला दिग्दर्शक संतोष सिवन यांच्या मल्याळम चित्रपट ‘अनंतभद्रम’द्वारे मोठे यश मिळाले. अश्मित पटेलशी ब्रेकअप झाल्यानंतर, रियाने तिचा जुना मित्र शिवम तिवारीला डेट केले आणि नंतर 2017 मध्ये त्याच्याशी लग्न केलं. रियाने ओटीटी प्लॅटफॉर्ममध्येही पाऊल ठेवलं असून ‘बेकाबू’, ‘रागिनी एमएमएस: रिटर्न्स’, ‘मिसमॅच 2’, ‘पती पत्नी और वो’ आणि ‘कॉल मी बे’ सारख्या सीरिजमध्येही काम केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List