गाड्या घ्या ना कलेक्टर; आताच्या आता ऑर्डर देतो, खटारा गाडीमुळे अजितदादा जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले
कोल्हापूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील शासकीय वाहन खराब होते. यामुळे अजितदादा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडी खराब होती. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अजित पवार यांनी आपला मोर्चा थेट जिल्हाधिकाऱयांकडे वळवला. ‘‘तुम्ही गाडय़ा घ्या ना कलेक्टर… मी आताच्या आता दोन गाडय़ांची ऑर्डर देतो, आधी ही गाडी बदला,’’ अशी सूचना अजितदादांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List