ठाण्यात एकाच रात्री 14 दुकाने फोडणारी नेपाळी दुकली जेरबंद; हत्यारांसह मोबाईल, रोख रक्कम जप्त

ठाण्यात एकाच रात्री 14 दुकाने फोडणारी नेपाळी दुकली जेरबंद; हत्यारांसह मोबाईल, रोख रक्कम जप्त

नौपाडा, चरई परिसरात एकाच रात्री 14 दुकाने फोडणाऱ्या नेपाळी दुकलीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. महंत भाने कामी व विष्णू रगवा कामी अशी त्यांची नावे असून या चोरट्यांकडून रोख रकमेसह हत्यारे, चार मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. या नेपाळी दुकलीने मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात केलेले नऊ गुन्हेदेखील उघडकीस आणले असून त्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.

ठाण्याच्या गजबजलेल्या चरई भागात 12 मार्च रोजी पहाटे एकाच रात्रीत 14 दुकाने फोडण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून दुकाने फोडणाऱ्यांचा छडा लावला आहे. पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशनपासून मीरा रोड व उल्हासनगरपर्यंत 90 ते 100 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. हे फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे महंत कामी व विष्णू कामी या दोघांना पकडले आहे.

अशी होती मोडस ऑपरेंडी

ठाण्यातील 14 दुकाने फोडणारे दोघेजण हे नेपाळी असून मीरा रोड व उल्हासनगर परिसरात ते राहत होते. ते वॉचमन म्हणून काम करायचे. महंत हा मार्केट परिसरात असलेल्या बंद दुकानांचे शटर उचकटून आत शिरायचा आणि आतील माल लंपास करायचा. त्याचा साथीदार विष्णू हा दूरवर उभा राहून त्याची रेकी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण चोरीचा छडा लावण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?