IPL 2025 – कोलकाताच रॉयल! डिकॉकची सुपर नॉक, राजस्थानचे सारेच अयशस्वी

IPL 2025 – कोलकाताच रॉयल! डिकॉकची सुपर नॉक, राजस्थानचे सारेच अयशस्वी

उ‌द्घाटनीय सामन्यात पहिल्याच षटकात बाद झालेल्या क्विंटन डिकॉकने आज शेवटपर्यंत झंझावाती फलंदाजी करत कोलकात्याला खणखणीत विजय मिळवून दिले आणि राजस्थानविरुद्ध आपणच रॉयल असल्याचे सिद्ध केले. गतवर्षी अंतिम फेरीत धडक मारणारा राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्या पराभवाला सामोरा गेला.

गेल्या पाच सामन्यांत षटकारांची बरसात होत होती. द्विशतकी टप्पे गाठले जात होते. मात्र आजचा सामना कमी धावसंख्येचा आणि कमी चुरशीचा झाला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना झटपट बाद करून 151 धावांपर्यंत मजल मारू दिली. येथेच कोलकात्याने अर्धी लाढई जिंकली होती.

त्यानंतर 152 धावांचा पाठलाग करताना मोईन अली (5) आणि अजिंक्य रहाणे (18) फार मोठी खेळी करू शकले नसले तरी आज क्विंटन डिकॉकने एकहातीच राजस्थानची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. त्याने आपल्या 61 धावांच्या चेंडूंत 97 धावांची अफलातून अभेद्य खेळी साकारली त्याने अंगक्रिष रघुवंशीसह (22) तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागी रचत संघाला 15 चेंडू आधीच सहज आणि सोपा विजय मिळवून दिला. 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या डिकॉकने पुढील 45 धावा 26 चेंडूंत काढताना 3 षटकार आणि 3 चौकार ठोकले. डिकॉकसाठी शतक कठीणच होते, तरीही रघुवंशीने स्ट्राइक डिकॉकलाच दिल्यामुळे तो 97 धावांपर्यंत पोहचू शकला.

राजस्थानचे सारेच अयशस्वी

राजस्थानच्या डावाला सावरणारी आज एकही त्यांच्या फलंदाजांकडून होऊ शकली नाही. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या यशस्वी जैसवालला या डावात दुहेरी अपयश आले. तो केवळ 29 धावाच करू शकला आणि त्याला समाधानकारक सलामीही देता आली नाही. दुसरीकडे संजू सॅमसननेही निराशा केली. तो 13 धावांवरच बाद झाला. सॅमसनच्या जागी कार्यवाहक कर्णधार रियान परागलाही झंझावाती मोठी खेळी करता आली नाही. त्याने तीन षटकार खेचले, पण तो 25 धावांवरच तंबूत परतला.

कोलकात्यासाठी वरुण चक्रवर्थीन रियान आणि वनिंदु हसरंगाची विकेट काढली. त्यामुळे राजस्थानचा डाव कसाबसा 151 धावांपर्यंत पोहचू शकला. कोलकात्याच्या वैभव अरोरा, हर्षित राणा, मोईन अली आणि वरुणने प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपत पहिल्या डावातच कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला होता. त्यावर क्विंटनने कळस चढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप ‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप
भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण...
साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण
कोरटकरला न्यायालयीन कोठडी
नवीन वर्षात गुढी उभारायची आहे, कामाला लागा! उद्धव ठाकरे यांचे रणशिंग
अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होतेय, सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही घटनाविरोधी; निवृत्त न्यायमूर्तीगौतम पटेल कडाडले
लोकशाही मार्ग कुणालाच सोडता येणार नाही, संविधानावर आघात केला तेव्हा इंदिरा गांधींनाही जनतेने पराभूत केले – शरद पवार
बाजारात उत्साहाची दडी, महागाई गगनाला भिडली, मुंबईकरांनी फक्त परंपरा जपली; मुहूर्ताला सोने खरेदीत 50 टक्क्यांची घट