‘पेडणेकर बाईंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं नाही’; दिशा सालियन प्रकरणात नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

‘पेडणेकर बाईंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं नाही’; दिशा सालियन प्रकरणात नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेत काही सवाल उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता. डॉक्टर बदलले गेले. रुग्णवाहिका बदलली. तीथे जो काही प्रकार झाला तो प्रकरण दडपण्यासाठी झाला. म्हणून दबाव कमी झाल्यावर तिच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली. ते सरकारकडे नाही तर कोर्टात गेले, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाला असेल तर पोलिसांनी त्वरीत एफआयआर दाखल करून चौकशी करावी, आरोपीला अटक करावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. हा कायदा तेव्हाही होता. माझ्याकडे कॉपी आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई का केली नाही? वाझे ताब्यात आहे. चार फटके दिले तर सर्व कळेल. या सर्वांचा कर्ताकरविता वाझे आहे. तीच्या वडिलांवर दबाव होता असं राणे यांनी म्हटलं आहे.

हे घाणेरडे कृत्य आहे. ही मर्दानगी नाही. चारपाच लोकांनी एका मुलीला धरायचं आणि तिच्यावर अत्याचार करायचा. तुम्ही सर्वांनी पेटून उठलं पाहिजे. जगात मुंबई पोलिसांचं नाव आहे. पण ते अजून का थांबले याचं आश्चर्य वाटतं. यातील सत्य सर्वांना माहीत आहे. का नाही पेडणेकर बाईंना पोलीस ताब्यात घेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. दिशाच्या आईवडिलांवर का दडपण आणलं गेलं? असा सवालही यावेळी राणे यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माणसांच्या मित्राला माणसाचा आजार जडला, कुत्रे बनले मधुमेहाची शिकार माणसांच्या मित्राला माणसाचा आजार जडला, कुत्रे बनले मधुमेहाची शिकार
शिर्डीत साईनगरीत आता भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असतो. साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुत्र्यांना...
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 3000 हजार रुपये मिळणार?
उद्धव ठाकरे यांचे आराध्य दैवत औरंगजेब, मातोश्रीवर त्याचाही फोटो लागणार, शिवसेना नेते संजय निरूपम यांचा घणाघात
‘विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत’; राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?
शाळकरी मुलांकडून ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेवर प्रेमाचा वर्षाव; पहा खास व्हिडीओ
‘नवऱ्याला रंगे हात पकडलं तेव्हा…’, घटस्फोटानंतर श्वेता तिवारीचं मोठं वक्तव्य
नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’