व्यापाऱ्यांकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली, व्हिडिओ कॉलवर मुलांच्या हत्येची धमकी, मुंबई पोलिसांनी त्याला असे पकडले?

व्यापाऱ्यांकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली, व्हिडिओ कॉलवर मुलांच्या हत्येची धमकी, मुंबई पोलिसांनी त्याला असे पकडले?

Mumbai Crime News: महाराष्ट्रातील व्यापाऱ्याकडून ‘गुंडा टॅक्स’ची वसुली करणारा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होतो. तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करुन पिस्तूल दाखवत व्यापाऱ्यांना धमक्या देत होता. पैसे दिले नाही तर तुमच्या मुलांची हत्या करु, अशी धमकी देत होतो. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रिजेश चौहान नावाचा गुंड फरार होतो. मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो जाळ्यात अडकला आहे.

व्हिडीओ कॉलवरुन धमकी

ब्रिजेश चौहान याने नवी मुंबईतील प्रशांत प्रभाकर दळवी आणि चंद्रकांत अर्जुन या दोन व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. त्याने या व्यापाऱ्यांना व्हिडीओ कॉल केला. त्यावर पिस्तुल दाखवत मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी पनवेल पोलीस ठाण्यात दोन गुन्हे (100/2025 आणि 103/2025, कलम 308(4) बीएनएस) नोंदवले होते. परंतु ब्रजेश चौहान फरार होता. तो मुंबईतून उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सकडे मदत मागितली.

असा रचला सापळा

मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने त्याच्या सापळा रचला. एसटीएफने वाराणसीला एक टीम पाठवली. त्यानंतर ब्रिजेश चौहान बलियामध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे एसटीएफ आणि पनवेल शहर पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. त्या टीममध्ये पोलीस उपाधीक्षक शैलेश प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव यांची टीम होती. त्या टीमने ब्रिजेश चौहान याला अटक केली.

मुळात बलिया येथील गडवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिगणी येथील ब्रिजेश चौहान हा रहिवाशी होता. याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोन व्यावसायिकांकडून गुंडा कराची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तो बराच काळ फरार होता. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले. त्या मोबाईनेच त्याने व्यापाऱ्यांना धमकी दिली होती.

ब्रिजेश चौहान पूर्वी मुंबईत राहत होतो. त्याने ज्यांना धमकी दिले ते प्रशांत प्रभाकर दळवी आणि चंद्रकांत अर्जुन या दोन व्यावसायिकांना तो ओळखत होतो. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही बाब मान्य केली. धमकी दिल्यास दोन्ही व्यापारी पैसे देतील, हेही त्याला माहीत होते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करुन त्याने धमकी दिल्याचे पोलिसांना सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब
यजमान मुंबई बंदरने दीपक सोरेनच्या एकमेव गोलच्या जोरावर अखिल हिंदुस्थानी मुख्य बंदरे हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत एसएमपीए (कोलकाता)संघाचा 1-0 ने...
उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार शिंदे गटात; ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा मोठा धक्का
टीम इंडिया चॅम्पियन! 25 वर्षानंतर बदला पूर्ण, न्यूझीलंडला पराभूत करत रोहितसेनेने जिंकले विजेतेपद
दापोली मतदार संघाला ताकद देणार, आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार
फटे लेकिन हटे नही! संजय राऊत यांनी सांगितला शिवसैनिकांच्या बळाचा मंत्र
एकदा झालेली ती चूक परत होता कामा नये! संजय राऊत यांचं शिवसैनिकांना आवाहन
“…तर संपूर्ण युक्रेनची फ्रंटलाइन कोसळेल”, एलोन मस्क यांचा इशारा