मोठी बातमी! मुंबईतील नागपाड्यात मोठी दुर्घटना, पाण्याच्या टाकीत गुदमरून 5 कामगारांचा मृत्यू
मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील नागपाडा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीमध्ये उतरले होते. मात्र जीव गुजमरल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीनं अग्निशमन दलाच्या मदतीनं मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List