‘…तर धनंजय मुंडेंवरही गुन्हा दाखल होऊ शकतो’, बड्या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाण साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहिती असते हे मी अनेक ठिकाणी ऐकले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे, असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहिती असते हे मी अनेक ठिकाणी ऐकले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कदाचित शीतयुद्ध चालू असल्याचे दिसते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभापृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देणे अपेक्षित होते, मात्र पाच दिवस झाले त्यांनी अजूनही त्यावर वक्तव्य केले नाही. त्यामुळे हा राजीनामा झाला असे आम्ही मानत नाही. पोलिसांना धागेदोरे सापडले तर ते धनंजय मुंडे वरती देखील गुन्हा दाखल करू शकतात. मला माहित नाही की पोलिसां जवळ काय माहिती आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात हक्क भंग मांडल्यामुळे राज्याला याची माहिती झाली नाहीतर फक्त मीडिया पुरतीच ही माहिती राहिली असती. मात्र त्यांनी स्वतःहून ही माहिती सभागृहाला दिली आता हे प्रकरण हक्कभंग समितीकडे जाईल आणि हक्क भंग समिती निर्णय घेईल. परंतु सभागृहाबाहेर बोललेली ही गोष्ट आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्क भंग लागू होईल असे वाटत नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्या बाबत ठरेल, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List