गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू…शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी

गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू…शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी

kalyan crime news: उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात झालेला वाद देशभर चर्चेत आला होता. यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणानंतर माजी आमदार गणपत गायकवाड सध्या कारागृहात आहेत. परंतु महेश गायकवाड यांनी धमकी मिळाली आहे. एका लग्नसमारंभात हे पत्र देवून धमकी देण्यात आली आहे.

काय आहे त्या चिठ्ठीत?

गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड याचे नाव घेऊ नको नाही तर तुझे बाबा सिद्दीकी करू, अशी धमकी महेश गायकवाड यांना दिली आहे. एका पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची ही धमकी मिळाली आहे. महेश गायकवाड हे अंबरनाथ येथील आनंदनगरमध्ये एका लग्नसमारंभात गेले होते. त्या ठिकाणी एका इसमाने ही चिठ्ठी त्यांना देत दिली. त्यात तुझे बाबा सिद्दीकी करू, असे लिहिले असल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ते पॉकीट कारागृहातील

महेश गायकवाड यांना लिहिलेल्या चिठ्ठीचा कागद आणि पॉकीट जेलमधील आहे. तो गणपत गायकवाड यांनीच पाठवल्याचा संशय महेश गायकवाड यांनी व्यक्त केला. गणपत गायकवाड पंधरा दिवस कारागृहात तर पंधरा दिवस जे.जे. रुग्णालयात असतात. त्यामुळे गणपत गायकवाड कारागृहातील कैद इतर आरोपीसारखे काढत नाही. त्याच्यावर अनेक आका लोकांचा हात आहे. त्यामुळे त्याची मजा चालली आहे. तसेच वैभव गायकवाड याला क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणात आपण सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची महेश गायकवाड यांनी म्हटले.

दरम्यान यापूर्वी महेश गायवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गणपत गायकवाड यांच्याबाबत अनेक आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, आरोपी माजी आमदार गणपत गायकवाड हे तळोजा जेलला आहे. गणपत गायकवाड यांना चेकअपच्या नावाखाली जे. जे. रुग्णालयात आणले जाते. त्यानंतर त्यांना मुंबई फिरवले जाते, असा गौप्यस्फोट महेश गायकवाड यांनी केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब
यजमान मुंबई बंदरने दीपक सोरेनच्या एकमेव गोलच्या जोरावर अखिल हिंदुस्थानी मुख्य बंदरे हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत एसएमपीए (कोलकाता)संघाचा 1-0 ने...
उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार शिंदे गटात; ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा मोठा धक्का
टीम इंडिया चॅम्पियन! 25 वर्षानंतर बदला पूर्ण, न्यूझीलंडला पराभूत करत रोहितसेनेने जिंकले विजेतेपद
दापोली मतदार संघाला ताकद देणार, आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार
फटे लेकिन हटे नही! संजय राऊत यांनी सांगितला शिवसैनिकांच्या बळाचा मंत्र
एकदा झालेली ती चूक परत होता कामा नये! संजय राऊत यांचं शिवसैनिकांना आवाहन
“…तर संपूर्ण युक्रेनची फ्रंटलाइन कोसळेल”, एलोन मस्क यांचा इशारा