जिल्ह्यात वृद्ध कलाकारांचे मानधन लटकले ; ‘आधार’ लिंकअभावी 6 महिन्यांपासून पैसे मिळालेच नाहीत

जिल्ह्यात वृद्ध कलाकारांचे मानधन लटकले ; ‘आधार’ लिंकअभावी 6 महिन्यांपासून पैसे मिळालेच नाहीत

आधार लिंक आणि मोबाईल नंबर पडताळणी व्हावी. जिल्ह्यातील 657 वृद्ध कलाकारांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून लटकले आहे. सध्या जिल्ह्यात 1498 वृद्ध कलाकारांना मानधन मिळत असून, त्यांतील 841 जणांची ‘आधार’ जोडणी झालेली आहे.

पुणे जिल्ह्यातून नव्याने 532 वृद्ध कलाकारांचे अर्ज मानधन योजनेसाठी आलेले आहेत. यामध्ये भक्ती संप्रदायाशी संबंधित गायक तमाशा क्षेत्रातील 55, जागरण गोंधळ क्षेत्रातील 14 आणि इतर लोककलावंत यांचे 71 अर्ज असून, या अर्जावर शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे मंजुरीची कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली कलाकार मानधन योजनेसंदर्भात बैठक झाली. जिल्ह्यात सद्यःस्थितीत 1498 वृद्ध कलाकारांना मानधन योजना लागू आहे. या कलाकारांमधील 657 कलाकारांची आधार जोडणी झालेली नाही अथवा त्यांची मोबाईल नंबर पडताळणी झाली नसल्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे सहा महिन्यांपासून त्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. हे वृद्ध कलाकार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड मोबाईलला लिंक करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

यासंदर्भात पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले, ‘ज्या वृद्ध कलाकारांचे आधार लिंक झालेले नाही, त्यांचा शोध घेण्यासंदर्भात ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक कलाकारांचे पत्ते चुकीचे आढळून येत असल्याने त्यांच्या नव्या पत्त्याची माहिती मिळवून संपर्क केला जात आहे.’

कलाकारांचा कोटा निश्चित

शासनाच्या नव्या निर्देशांप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेल्या वृद्ध कलाकारांच्या मानधन योजनेतील एकूण अजर्जापैकी भक्त संप्रदायाशी संबंधित कलाकार 10 टक्के, संघटित असंघटित कलाकार ६ टक्के आणि लोप पावत चाललेल्या कला साहित्यिक प्रयोगशील कलाकारांना 30 टक्के याप्रमाणे कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या अर्जावर निवड करताना हे निकष पाळले जाणार आहेत. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यासाठी वृद्ध कलाकार अर्ज मंजुरीचा वार्षिक कोटा 100 कलाकार याप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानचा सलग दुसरा विजय  हिंदुस्थानचा सलग दुसरा विजय 
यजमान हिंदुस्थानी संघाने हाँगकाँग-चायना संघाचा 2-1 फरकाने पराभव करून सलग दुसऱ्या विजयासह बिली जीन किंग कप आशिया ओशियाना गट 1...
गुजरातच्या ‘पृथ्वी’ची 11.51 लाखांत विक्री
IPL 2025 – दिल्ली सुसाट; केएल राहुल एकटा नडला अन् सामना खेचून आणला, RCB चा 6 विकेटने पराभव
‘छावा’ चित्रपट व्हायरल करणाऱ्याला मुंबई पोलिसांचा दणका, केली मोठी कारवाई
तहव्वूर राणाला पतियाळा कोर्टात हजर करणार, NIA ने शेअर केला पहिला फोटो
पावसामुळे मंदिरावर झाड कोसळले, 6 जणांचा मृत्यू; 8 गंभीर जखमी
एक मासा पकडला, मग दुसरा पकडण्याच्या नादात तरुण जीव गमावून बसला