युवासेनेच्या मागणीला यश! पॅटच्या परीक्षांत सुधारणा करणार, शिक्षण उपसंचालकांचे आश्वासन
पॅट परीक्षांमुळे शिक्षकांचे व विद्यार्थी-पालकांचे सुट्टीचे नियोजन कोलमडू नये म्हणून वेळापत्रकात सुधारणा करण्याचे आश्वासन मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांनी दिले आहे. या परीक्षा काही दिवस आधी घेण्याची मागणी युवासेनेने केली होती. ही मागणी मान्य करत उपसंचालकांनी परीक्षा लवकर घेण्याचे आश्वासन दिले आहे.
पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीकरिता (पॅट) नेमून दिलेल्या वेळापत्रकामुळे परीक्षांचा काळ 25 एप्रिलपर्यंत लांबणार आहे. शिवाय या परीक्षांचा निकाल एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करणे बंधनकारक आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे सुट्टीचे नियोजन कोलमडणार असल्याने या परीक्षा काही दिवस आधी घेण्यात याव्या, अशी मागणी शिक्षकांनी व पालकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. पालकांच्या तक्रारींची दखल घेत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांची भेट घेऊन शिक्षण आयुक्तांनी नेमून दिलेल्या वेळापत्रकात सुधारणा करून परीक्षा लवकर घेण्याची मागणी केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List