Jalna News – मुरुम माफियांचा परतूरच्या महिला तहसिलदाराच्या पथकावर हल्ला, जिल्ह्यात खळबळ

Jalna News – मुरुम माफियांचा परतूरच्या महिला तहसिलदाराच्या पथकावर हल्ला, जिल्ह्यात खळबळ

जिल्ह्यात ऐकिकडे वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे, तर दुसरीकडे आता मुरुम माफियांनीही आपले तोंड वर काढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरुन उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीनुसार, 7 मार्च रोजी त्या खासगी वाहनाने अवैध गौनखणीज उत्खनन प्रतिबंधामक कार्यवाही करण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान रात्री 1 च्या सुमारास परतुरमधील इंदिरानगरच्या पुढे आबा रोडच्या डाव्या बाजुला एका जेसीबी उत्खनन करुन एका हायवात भरताना दिसून आली. त्यामुळे त्या ठिकाणी तहसीलदार गेल्या असत्या हायवा व जेसीबी चालकाने जेसीबी घेऊन पळ काढला. त्यानंतर पथकातील व्यंकट दडंवाडसह महसुल अधिकारी गणेश काळे महसूल सेवकाच्या मोबाईलवर फोन करुन बोलवले तेव्हा पाठलाग सुरू केला असता पारडगाव रोडला जेसीबीचे टायर खराब झाल्याने जेसीबी थांबला. तेव्हा जेसीबी ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर परतूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना संपर्क साधून पोलीस पथक पाठवण्यास सांगितले. जेसीबीचे फोटो काढत असताना तेथे सहा ते सात आरोपींनी तहसीलदारांच्या हातातील मोबाईल हिसकावला व शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जेसीबी पळवून नेला. यात सहा ते सात लोकांनी हल्ला केला. तसेच सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सर्व आरोपींवर योग्य ती कायदेशीर करण्यात यावी, अशी मागणी तहसिलदारांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान ‘मी पवित्र नाही, वासनांनी भरलेली आहे’, अभिनेत्रीचे खळबळजनक विधान
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. मग त्यांच्या खासगी आयुष्यामुळे असो वा त्यांच्या आगामी सिनेमांमुळे ते सतत चर्चेत...
सावळ्या रंगामुळे 1000 वेळा रिजेक्ट झाली; स्टारकिडशी लग्न, घर तोडल्याचा आरोप; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
रमजानच्या महिन्यात मुस्लिम अभिनेता पोहोचला तिरुपती मंदिरात, फोटो पाहून धर्म रक्षक संतापले
सलमान – अभिषेक नाही, ‘या’ श्रीमंत उद्योजकासोबत ऐश्वर्याला करायचं होतं लग्न, दोघांचे Unseen फोटो व्हायरल
घटस्फोटानंतर धनश्री वर्माने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली ‘आधी माझे…’
वयाच्या 7 व्या वर्षी घर सोडलं, कॉल सेंटरमध्ये काम केलं,अन् आज आहे इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक
आदर्श रस्त्यांमुळे पुणे सुसाट ! सोलापूर-नगर रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा