IAF Jet Crashed – हरयाणात प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
हरयाणात प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाचे जेट जग्वार हे लढाऊ विमान शुक्रवारी कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाचे तुकडे होऊन दूरवर पसरले. पायलट पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून सुखरूप बाहेर पडण्यास यशस्वी झाल्याने जीवितहानी टळली. हरियाणातील पंचकुलामध्ये बादलवाला गावात ही दुर्घटना घडली. तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दुर्घटनेबाबत तपास करत आहे.
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, हे जग्वार लढाऊ विमान अंबाला येथे नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. पायलटने विमानातून बाहेर पडण्यापूर्वी विमानाला दाट लोकवस्तीपासून दूर नेण्यात यश मिळवले. अपघाताची तपास करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. हवाई दलाने सोशल मीडियावर पोस्ट करत विमान दुर्घटनेची माहिती दिली.
A Jaguar aircraft of the IAF crashed at Ambala, during a routine training sortie today, after encountering system malfunction. The pilot maneuvered the aircraft away from any habitation on ground, before ejecting safely.
An inquiry has been ordered by the IAF, to ascertain the…
— Indian Air Force (@IAF_MCC) March 7, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List